मुंबई - बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. आपल्य़ा कर्णधारपदाला साजेसा खेळ करत रोहितने ४३ चेंडूंत ८५ धावा चोपल्या. त्याच्या या कामगिरीमुळे रोहित हा टी-२० क्रिकेटमध्ये खास विक्रम करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे.
हेही वाचा - 'चहलसुद्धा मोठ-मोठे षटकार मारू शकतो'
राजकोटमध्ये झालेल्या सामन्यात रोहितने 85 धावांची खेळी करत ६ चौकार आणि ६ षटकार मारले. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०० सामन्यात त्याच्या २५३७ धावा झाल्या आहेत. २५०० धावांचा टप्पा पार करणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने धोनीच्या ३४ षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू -
- २५३७ - रोहित शर्मा (सामने १००)
- २४५० - विराट कोहली (सामने ७२)
- २३५९ - मार्टिन गप्टिल (सामने ८२)
- २२६३ - शोएब मलिक (सामने १११)
- २१४० - ब्रेंडन मॅक्यूलम (सामने ७१)