जोहान्सबर्ग - कोरोना व्हायरसच्या वातावरणात दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. 18 जुलैला 24 अव्वल खेळाडूंसह तीन संघांची स्पर्धा होणार आहे. यापूर्वी हा सामना 27 जून रोजी होणार होता. परंतु आरोग्यसंबंधित मार्गदर्शक सूचना वेळेत मंजूर न झाल्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.
दिवंगत अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामना खेळवला जाणार आहे, असे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने सांगितले. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक्स फॉल म्हणाले, ''हा सामना आयोजित करण्यासाठी मंडेला यांच्या जन्मदिनापेक्षा दुसरा चांगला दिवस असू शकत नाही. कोरोना व्हायरसचा फटका पडलेल्यांना मदत करण्यासाठी पैसे गोळा करणे हे या सामन्याचे उद्दिष्ट आहे.''
-
Hi Kwena.The #SolidarityCup is a match whose proceeds will go to the Solidarity Fund & the Hardship Fund to help fellow South Africans who have been badly affected by COVID-19. The players are also giving up their match fees as their contribution to the cause. We hope this helps. https://t.co/Oh974mOhoU
— Cricket South Africa (@OfficialCSA) July 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hi Kwena.The #SolidarityCup is a match whose proceeds will go to the Solidarity Fund & the Hardship Fund to help fellow South Africans who have been badly affected by COVID-19. The players are also giving up their match fees as their contribution to the cause. We hope this helps. https://t.co/Oh974mOhoU
— Cricket South Africa (@OfficialCSA) July 1, 2020Hi Kwena.The #SolidarityCup is a match whose proceeds will go to the Solidarity Fund & the Hardship Fund to help fellow South Africans who have been badly affected by COVID-19. The players are also giving up their match fees as their contribution to the cause. We hope this helps. https://t.co/Oh974mOhoU
— Cricket South Africa (@OfficialCSA) July 1, 2020
दक्षिण आफ्रिकेतील कोरोना साथीच्या नंतर थेट प्रसारित होणारा हा पहिला क्रीडाविषयक कार्यक्रम असेल. ''थ्रीटी क्रिकेट'' म्हणून ओळखला जाणारा हा सामना सेंच्युरियनमध्ये होईल. आठ खेळाडूंचे तीन संघ असतील.
संघांचे कर्णधार क्विंटन डिकॉक, एबी डिव्हिलियर्स आणि कगिसो रबाडा असतील. खेळाडू तीन दिवस अगोदर एकत्र जमतील. सामन्यापूर्वी सर्वांची कोरोना व्हायरसची चाचणी घेण्यात येईल. यापूर्वी पाच दिवसांपूर्वी सरकारने क्रिकेटपटूंना गटात सराव करण्याची परवानगी दिली आहे.