लंडन - ब्रिटिश सरकारने 11 जुलैपासून इंग्लंडमध्ये हौशी क्रिकेट सुरू करण्यास मान्यता दिली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ही माहिती दिली. कोरोनामुळे क्रिकेट उपक्रम सध्या बंद आहेत. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि विंडीज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. ही मालिका 8 जुलैपासून रंगेल.
ईसीबीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ''ब्रिटिश सरकारने पुढील रणनीती जाहीर केली आहे. त्याच वेळी इंग्लंडमध्ये हौशी क्रिकेटमध्ये पुनरागमन होईल, ज्यात सामाजिक अंतर आणि स्वच्छतेचे नियम आहेत. हौशी क्रिकेटच्या पुनरागनासंदर्भात नियमावली तयार झाली आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसनच्या वक्तव्यानंतर यांना अंतिम रूप देण्यात येईल आणि पुढील आठवड्यात ते जाहीर केले जातील.''
ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टॉम हॅरिसन म्हणाले, "हौशी क्रिकेटला सरकारचा हिरवा कंदील मिळणे हे आमच्या देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे."