बंगळुरू - एबी डिव्हिलियर्सची तुफानी खेळी आणि चांगल्या गोलंदाजीमुळे बंगळुरुला विजय मिळवता आला. एबी डिव्हिलियर्सच्या झंझावाती फलंदाजीमुळे आरसीबीला प्रथम फलंदाजी करताना 202 धावा करता आल्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग पंजाबला करता आला नाही. आरसीबीने हा सामना 17 धावांनी जिंकला. आरसीबीने पंजाबवर मात करत विजयी हॅट्रिक साजरी केली.
एबी डिव्हिलियर्स (८२) तर मार्कस स्टोईनिसच्या नाबाद (४६ )धावांच्या जोरावर बंगळुरूने पंजाबपुढे २०३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने निर्धारित २० षटकात ४ बाद २०२ धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, आर.अश्विनने प्रत्येकी १ बळी घेतले.
पंजाबने नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांनी ३५ धावांची सलामी दिली. त्यानंतर विराट १३ धावांवर स्वस्तात माघारी परतला. पटेल आणि एबी डिविलियर्स यांनी आक्रमक फटकेबाजी केली. पटेल २४ चेंडूत ४३ तर एबी डिविलियर्स ४४ चेंडूत ८२ धावा कुटल्या. त्यात ७ षटकार आणि ३ चौकार मारले.
मार्कस स्टोईनिस यांने शेवटच्या षटकात तुफानी फटकेबाज केली. त्यामुळे बंगळुरूने २०० धावांचा टप्पा पूर्ण केला. मार्कस ३४ चेंडूत ४६ धावांचे योगदान दिले. पंजाबकडून मोहम्मद शमी, एम. अश्विन, आर.अश्विन आणि व्हिजोनने प्रत्येकी १ बळी घेतला.