ETV Bharat / sports

गर्भवती अनुष्काची विराट घेतोय अशी काळजी; व्हिडीओ व्हायरल - अनुष्काची विराट घेतोय काळजी न्यूज

विराट आणि अनुष्काचा व्हिडिओ एका चाहत्याने इस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट मैदानावर सामना खेळत असताना हाताने इशारा करून अनुष्काला जेवण केले का असे विचारत आहे.

rcb captain virat kohli caring for his wife anushka sharma during ipl match asking for food
गरोदर अनुष्काची विराट घेतोय अशी काळजी; व्हिडीओ व्हायरल
author img

By

Published : Oct 28, 2020, 8:59 AM IST

दुबई - अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती असून ती विराट कोहलीसोबत दुबईमध्ये आहे. विराट आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी युएईमध्ये आहे. तर अनुष्का विराटला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजेरी लावत आहे. अशा स्थितीत विराट अनुष्काची पुरेपूर काळजी घेताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात विराट बंगळुरू संघासोबत आहे. तरीदेखील तो मैदानातून अनुष्काला हातवारे करत जेवण केलं का? असे विचारताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर विराटचे कौतूक

विराट आणि अनुष्काचा व्हिडिओ एका चाहत्याने इस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट मैदानावर सामना खेळत असताना हाताने इशारा करून अनुष्काला जेवण केले का असे विचारत आहे. विराटच्या या कृतीचे सोशल मीडियावरून अनेकांनी कौतूक केले आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाइक, कमेंट आणि शेअर केलं आहे.

दरम्यान, विराटने आयपीएल स्पर्धेला सुरूवात होण्याआधी आमच्या घरात गुड न्यूज येणार असल्याचे जाहीर केले. 2013 पासून अनुष्का शर्मा आणि विराटचे प्रेमसंबंध होते. या नात्याने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर दोघांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीच्या मिलान शहरात लग्न केले. या लग्नाला अगदी मोजक्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना आमंत्रित करण्यात आले होते.

आज मुंबई-बंगळुरू आमने-सामने -

आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सामना होत असून दोन्ही संघांचे लक्ष प्ले ऑफ फेरीतील स्थान पक्के करण्याचे आहे. यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे सलग तिसऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - संघात स्थान न मिळालेल्या रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय!

हेही वाचा - MI VS RCB : मुंबई-बंगळुरू आमने-सामने; जिंकणारा संघ करेल प्ले ऑफचे स्थान पक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.