मुंबई - आयपीएलमधील कोलकाता संघाने न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्क्यूलमची मुख्य प्रशिक्षकपदी नुकतीच निवड केली. आता याच स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाने आपल्या नवीन प्रशिक्षकाची निवड केली आहे. ही निवड करताना आधीचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची हकालपट्टी केली आहे.
आरसीबीने न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांना क्रिकेट कार्यकारी संचालक म्हणून तर ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सायमन कॅटिच यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. हेसन हे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. मात्र रवी शास्त्री यांची फेरनिवड झाल्याने त्यांना स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे २०२० च्या आयपीएल हंगामात हेसन आरसीबीचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील.
आरसीबी संघाने मागच्या हंगामातील गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहराला पुढच्या वर्षासाठी वगळले आहे. आरसीबी संघाला आयपीएलचे एकदाही जेतेपद जिंकता आलेले नाही. याबद्दल संघाचे अध्यक्ष संजिव चूरीवाला म्हणाले, 'आरसीबीला विश्वासू, सन्माननीय आणि चांगली कामगिरी करणारा संघ बनवण्याचा हेतू आहे. म्हणूनच माईक हेसन आणि सायमन कॅटिच यांची नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे.'
-
We are happy to announce Simon Katich as the new Head Coach of Royal Challengers Bangalore. Simon will be in charge of inculcating a high-performance culture within the team. #PlayBold pic.twitter.com/L833g72fyP
— Royal Challengers (@RCBTweets) August 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We are happy to announce Simon Katich as the new Head Coach of Royal Challengers Bangalore. Simon will be in charge of inculcating a high-performance culture within the team. #PlayBold pic.twitter.com/L833g72fyP
— Royal Challengers (@RCBTweets) August 23, 2019We are happy to announce Simon Katich as the new Head Coach of Royal Challengers Bangalore. Simon will be in charge of inculcating a high-performance culture within the team. #PlayBold pic.twitter.com/L833g72fyP
— Royal Challengers (@RCBTweets) August 23, 2019
आरसीबी संघाने आयपीएलच्या अकराव्या हंगामात निराशाजनक कामगिरी केली होती. गुणतालिकेत हा संघ आठव्या स्थानावर होता. आरसीबीचा १४ सामन्यांपैकी ५ सामन्यांत पराभव झाला होता.