मुंबई - पूर्ण देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम चालू असतानाच सोमवारी भारतीय क्रिकेट बोर्डाने आयसीसी विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. जाहीर केलेल्या संघात बीसीसीआयने अनपेक्षितपणे अष्ठपैलू रवींद्र जडेजाला संधी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. निवड झाल्याच्या काही तासांमध्येच जडेजा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताना दिसला.
जडेजाने आपले अधिकृत ट्विटर हँडलवरुन 'I support BJP' असे ट्विट केले आहे. तसेच या ट्विटमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केले आहे. जडेजाच्या या ट्विटला नरेंद्र मोदींनी उत्तर देत म्हटले की,'रवींद्र जडेजा धन्यवाद, विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात तुझी निवड झाल्याबद्दल अभिनंदन.'
-
Thank you @imjadeja!
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
And, congratulations on being selected for the Indian cricket team for the 2019 World Cup. My best wishes. https://t.co/wLbssqSoTB
">Thank you @imjadeja!
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 16, 2019
And, congratulations on being selected for the Indian cricket team for the 2019 World Cup. My best wishes. https://t.co/wLbssqSoTBThank you @imjadeja!
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 16, 2019
And, congratulations on being selected for the Indian cricket team for the 2019 World Cup. My best wishes. https://t.co/wLbssqSoTB
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जडेजाने केलेल्या या ट्विटची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. जडेजाची पत्नी रिवाबाने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर जडेजाच्या बहिणीने आणि वडिलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मात्र, जडेजाने आपल्या पत्नीची साथ देत भाजपला पाठिंबा दिला आहे.
गेल्याच महिन्यात भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरनेही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.