मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करणाऱ्या सल्लागार समितीला (CAC) नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमुळे रवी शास्त्रीचे प्रशिक्षकपद धोक्यात येऊ शकते. दरम्यान, बीसीसीआय लवाद अधिकारी डी.के. जैन यांनी ही नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून जर आरोप सिध्द झाल्यास, भारतीय प्रशिक्षक पदाची नियुक्ती प्रक्रिया पुन्हा नव्याने होऊ शकते.
हेही वाचा - युवीच्या 'चिकना चमेला' लूकवर सानिया मिर्झाचे मजेशीर कमेंट
डी. के. जैन यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये, रवी शात्री यांची नियुक्ती करणाऱ्या माजी क्रिकेटर्संकडून या प्रकरणी १० आक्टोंबरपर्यंत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांच्या समितीने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती केली होती.
तर हितसंबंधांसंदर्भातील नोटीसनंतर सल्लागार समितीचे सदस्य आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत काय आढळते याची उत्सुकता लागली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी या तिघांविरोधात हितसंबंधाची तक्रार केली आहे.
हेही वाचा - माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर गोत्यात, फसवणूक प्रकरणी तक्रार दाखल