मुंबई - रणजी करंडक स्पर्धेच्या ९ फेरीतील सामने खेळवण्यात येत आहेत. आज सामन्याचा दुसरा दिवस असून गोवा संघाने मिझोरामचा एक डाव आणि २११ धावांनी पराभव केला.
- बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड सामन्यात महाराष्ट्राने दुसऱ्या दिवसा अखेर ९६ धावांची आघाडी मिळवली आहे. महाराष्ट्राचा पहिला डाव २०७ मध्ये आटोपला. तेव्हा उत्तराखंडने पहिल्या डावात २५१ धावा केल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात २ बाद १४० धावा केल्या आहेत.
- छत्तीसगड विरुद्ध सर्व्हिसेस सामन्यात छत्तीसगड २०२ धावांनी पिछाडीवर आहे. छत्तीसगडचा पहिला डाव १७९ धावांत आटोपला तेव्हा सर्व्हिसेसने पहिल्या डावात ३९८ धावा केल्या. दुसऱ्या डावात छत्तीसगडने बिनबाद १७ धावा केल्या आहेत.
- दिल्ली विरुद्ध राजस्थान - दिल्लीच्या पहिल्या डावातील ६२३ धावांच्या प्रत्युत्तरादाखल राजस्थानने पहिल्या डावात ४ बाद ११४ धावा केल्या आहेत. राजस्थान ५०८ धावांनी पिछाडीवर आहे.
- विदर्भ विरुद्ध हैदराबाद - हैदराबादने पहिल्या डावात २७२ धावा केल्या होत्या. तर विदर्भाने आपल्या पहिल्या डावात ४ बाद २४२ धावा केल्या आहेत. विदर्भ ३० धावांनी पिछाडीवर आहे.
- कर्नाटक विरुद्ध बडोदा - बडोदाचा पहिला डाव ८५ धावात आटोपला. तेव्हा कर्नाटकाने २३३ धावा केल्या. बडोदाने दुसऱ्या डावात ५ बाद २०८ धावा केल्या आहेत. बडोदाकडे ६० धावांची आघाडी आहे.
- सौराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू - तामिळनाडूच्या ४२४ धावांच्या प्रत्युत्तरादाखल सौराष्ट्रने ३ बाद १०७ धावा केल्या आहेत.
- पाँडिचेरी विरुद्ध नागालँड - नागालँडचा पहिला डाव १७६ धावात आटोपला तेव्हा पाँडिचेरीने ७ बाद ५१७ धावा केल्या आहेत. पाँडिचेरीने या सामन्यात ३४१ धावांची आघाडी मिळवली आहे.
- जम्मू-काश्मीर विरुद्ध हरयाणा - जम्मू-काश्मीरचा पहिला डाव ३४० धावांत आटोपला. तेव्हा हरयाणाने २९१ धावा केल्या आहेत. हरयाणा ४९ धावांनी पिछाडीवर आहे.
- उत्तर प्रदेश विरुद्ध हिमाचल प्रदेश - हिमाचलने पहिल्या डावात २२० धावा केल्या होत्या. यूपीचा पहिला डाव ११९ धावात ढेपाळला. त्यानंतर हिमाचलने ३ बाद १८२ धावा केल्या आहेत. हिमाचलकडे २८३ धावांची आघाडी आहे.
- मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश - मुंबईच्या ४२७ धावांच्या प्रत्युत्तरादाखल मध्य प्रदेशने ७ बाद २०० धावा केल्या आहेत.
- पंजाब विरुद्ध बंगाल - बंगालचा पहिला डाव १३८ धावांमध्ये आटोपला. तेव्हा पंजाब संघालाही १५१ धावा करता आल्या. दुसऱ्या डावात बंगालने ९ बाद १९९ धावा केल्या आहेत. बंगालकडे १८६ धावांची आघाडी आहे.
- गुजरात विरुद्ध आंध्र प्रदेश - आंध्रचा संपूर्ण संघ पहिल्या डावात १७७ धावांमध्ये ढेर झाला. तेव्हा गुजरातने ६ बाद ३५४ धावा केल्या आहेत. गुजरातकडे १७७ धावांची आघाडी आहे.
- ओडिशा विरुद्ध झारखंड - ओडिशाच्या ४३६ धावांच्या प्रत्युत्तरादाखल झारखंडने २ बाद ७१ धावा केल्या आहेत. झारखंडकडे ३६५ धावांची आघाडी आहे.
- मिझोराम विरुद्ध गोवा - गोवाने ४ बाद ४९० धावांवर पहिला डाव घोषित केला. तेव्हा मिझोरामचा संघ पहिल्या डावात १०९ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावातही मिझोरामची फलंदाजी ढेपाळली आणि त्यांना १७० धावा करता आल्या. हा सामना गोवाने एक डाव आमि २११ धावांनी जिंकला.
- सिक्कीम विरुद्ध बिहार - बिहारने पहिल्या डावात ३०५ धावा केल्या होत्या. तर सिक्कीमने २७२ धावा केल्या.
- अरुणाचल प्रदेश विरुद्ध मेघालय - मेघालयने आपला पहिला डाव ९ बाद ५७६ धावांवर घोषित केला. तेव्हा अरुणाचलने ५ बाद ११५ धावा केल्या आहेत. अरुणांचल ४६१ धावांनी पिछाडीवर आहे.
- मणिपूर विरुद्ध चंदीगड - चंदीगडने आपला पहिला डाव ८ बाद ६७२ धावांवर घोषित केला. तेव्हा मणिपूरचा पहिल्या डाव ६३ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात मणिपूरने बिनबाद ३३ धावा केल्या आहेत.