ETV Bharat / sports

रणजी करंडक २०१९-२० : पहिला दिवस, सर्व सामन्यांचा आढावा; वाचा एका क्लिकवर

रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कर्नाटकचा देवदत्त पडीक्कल, पंजाबचा सिद्धार्थ कौल, केरळचा रॉबिन उथप्पा, मुंबईचा पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे, गुजरातचा पियूष चावला यांनी शानदार प्रदर्शन केले.

Ranji Trophy 2019-20 : Groups, format, players to watch out first day report
रणजी करंडक २०१९-२० : पहिला दिवस, सर्व सामन्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Dec 9, 2019, 9:08 PM IST

नवी दिल्ली - रणजी करंडक स्पर्धेच्या २०१९-२० हंगामाला आजपासून सुरुवात झाली. यंदाच्या हंगामात ३८ संघानी सहभाग नोंदवला असून या संघांमध्ये ४ गटात एकूण १६९ सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीला आजपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कर्नाटकचा देवदत्त पडीक्कल, पंजाबचा सिध्दार्थ कौल, केरळचा रॉबिन उथप्पा, मुंबईचा पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे, गुजरातचा पियूष चावला यांनी शानदार प्रदर्शन केले.

'ग्रुप ए'चा पहिल्या दिवशीच्या खेळाचा संक्षिप्त आढावा -

आंध्र प्रदेश विरुध्द विदर्भ -
विजयवाडा येथे खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात आंध्रने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २११ धावा केल्या. कर्णधार हनुमा विहारीने ८३ धावांची खेळी केली. तर प्रत्युत्तरादाखल विदर्भाने पहिल्या दिवसाअखेर बिनबाद २६ धावा केल्या आहेत.

हैदराबाद विरुध्द गुजरात -
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाअखेर सर्वबाद २३३ धावा केल्या. गुजरातकडून पियुष चावलाने ३ गडी बाद केले.

केरळ विरुध्द दिल्ली -
नाणेफेक जिंकून केरळने प्रथम फलंदाजी करत पहिल्या दिवसाअखेर ३ बाद २७६ धावा केल्या आहेत. रॉबिन उथप्पाने शानदार (१०२) शतकी खेळी केली.

राजस्थान विरुध्द पंजाब -
जयपूरमध्ये रंगलेल्या या सामन्यात राजस्थानने पहिल्या दिवसाअखेर ९ बाद २५६ धावा केल्या आहेत. पंजाबकडून सिद्धार्थ कौलने ३ गडी बाद केले.

'ग्रुप बी'चा पहिल्या दिवशीच्या खेळाचा संक्षिप्त आढावा -
मुंबई विरुध्द बडोदा -

मुंबईने प्रथम फलंदाजी करत ८ बाद ३६२ धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ (६६) आणि अजिंक्य रहाणे (७९) यांनी अर्धशतकी खेळी केली. तर शार्दुल ठाकूरनेही ६४ धावा झोडपल्या.

हिमाचल प्रदेश विरुध्द सौराष्ट्र
धर्मशाळा येथील मैदानावर रंगलेल्या या सामन्यात हिमाचलचा पहिला डाव १२० धावात आटोपला. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनादकटने ३ गडी बाद केले. तर प्रत्युत्तरादाखल सौराष्ट्रचा पहिला डाव गडगडला. पहिल्या दिवसा अखेर सौराष्ट्रने ७ बाद ९३ धावा केल्या आहेत.

कर्नाट विरुध्द तामिळनाडू
कर्नाटकने पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २५९ धावा केल्या आहेत. देवदत्त पडीक्कल (७८) तर मयांक अग्रवालने ४३ धावांची खेळी केली.

उत्तर प्रदेश विरुध्द रेल्वे -
मेरठच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २४४ धावा केल्या आहेत.

'ग्रुप सी'चा पहिल्या दिवशीच्या खेळाचा संक्षिप्त आढावा -

हरियाणा विरुध्द महाराष्ट्र -
हरियाणाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाअखेर ३ बाद २७९ धावा केल्या आहेत.

उत्तराखंड विरुध्द जम्मू-काश्मिर -
जम्मू-काश्मिरचा संघ पहिल्या डावात १८२ धावांवर आटोपला. तर उत्तराखंडची अवस्था ७ बाद ६४ अशी झाली आहे.

आसाम विरुध्द सर्विसेस -
सर्विसेसचा पहिला डाव १२४ धावांत ढेपाळला. तर आसामने ३ बाद ८१ धावा केल्या आहेत.

त्रिपूरा विरुध्द झारखंड -
त्रिपुराने प्रथम फलंदाजी करत ८ बाद २६३ धावा केल्या आहेत.

छत्तीसगड विरुध्द ओडिशा -
छत्तीसगडचा पहिला डाव १३४ धावांवर संपला. तेव्हा ओडिशाने ३ बाद ४८ धावा केल्या आहेत.

'ग्रुप डी'चा पहिल्या दिवशीच्या खेळाचा संक्षिप्त आढावा -

मिझोराम विरुध्द मणिपूर -
कोलकाताच्या मैदानात खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात मिझोरामचा पहिला डाव अवघ्या ६५ धावात आटोपला. विशेष म्हणजे, तब्बल ७ फलंदाजांना खातेही खोलता आले नाही. मणिपूरचा आरआर सिंहने २२ धावात ८ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल मणिपूरने ७ बाद २५५ धावा केल्या आहेत.

मेघालय विरुध्द नागालँड -
मेघालयने ९ बाद २६८ धावा केल्या आहेत.

बिहार विरुध्द पाँडिचेरी -
बिहारचा पहिला डाव १४७ धावात आटोपला, तर पाँडिचेरी संघाने बिनबाद ६२ धावा केल्या आहेत.

अरुणाचल प्रदेश विरुध्द चंदीगड -
अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव १४७ धावात ढेपाळला. तेव्हा चंदीगडने १ बाद २३६ धावा करत ८९ धावांची आघाडी घेतली आहे.

सिक्किम विरुध्द गोवा -
सिक्किमचा पहिला डाव १३६ धावा आटोपला. तेव्हा गोवाने ३ बाद १२४ धावा केल्या आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.