मुंबई - रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाने सलामीच्या सामन्यात बडोद्याचा ३०९ धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली. सर्वाधिक वेळा रणजी 'चॅम्पियन' ठरलेला मुंबईचा संघ आजपासून वानखेडे स्टेडियमवर रेल्वेशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.
रणजी क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप 'ब' गटात होणाऱ्या या सामन्यात मुंबईचा अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. या दोघांशिवाय न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघात निवड झालेल्या सूर्यकुमार यादव याच्या कामगिरीवर विशेष लक्ष्य असणार आहे.
बडोद्याविरुद्धच्या लढतीत अजिंक्यला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. मात्र भारत अ संघातून न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याला रणजीत आपली छाप सोडायची आहे. पृथ्वीसुद्धा न्यूझीलंड दौऱ्यात निवडला गेला आहे. आठ महिन्यांच्या बंदीनंतर पुनरागमन करताना त्याने पहिल्या रणजी सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. ती लय त्याला कायम ठेवावी लागेल.
हेही वाचा - भारताच्या 'या' गोलंदाजानं प्रशिक्षकाला केली शिवीगाळ
हेही वाचा - भारत विरुद्ध श्रीलंका टी-२० सामना पाहा, फक्त 'इतक्या' रुपयात