हैदराबाद - रणजी करंडक २०१९-२० स्पर्धेच्या सातव्या फेरीला सुरूवात झाली असून आज या फेरीचा दुसरा दिवस होता. मध्य प्रदेशचा गोलंदाज रवी यादव याने रणजी स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या षटकात हॅट्ट्रिक साधली. याशिवाय पावसाने अनेक ठिकाणी खेळवण्यात आलेल्या सामन्यात व्यत्यय आणला.
ग्रुप ए
- बंगाल विरुद्ध दिल्ली -
- कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात बंगालने प्रथम फलंदाजी करताना ३१८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्ली संघाने ६ बाद १९२ धावा केल्या आहेत. दिल्ली १२६ धावांनी पिछाडीवर आहे.
- केरळ विरुद्ध आंध्र प्रदेश -
केरळचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. तेव्हा आंध्र प्रदेशने २५५ धावा करत पहिल्या डावात ९१ धावांची आघाडी मिळवली. - हैदराबाद विरुद्ध राजस्थान -
हैदराबादच्या पहिल्या डावातील १७१ धावांच्या प्रत्युत्तरादाखल राजस्थानचा संघ १३५ धावा करु शकला. दुसऱ्या दिवसाअखेर हैदराबादने दुसऱ्या डावात ६ बाद १०१ धावा केल्या आहेत. - विदर्भ विरुद्ध गुजरात -
विदर्भाचा पहिला डाव १४२ धावांवर आटोपला. तेव्हा गुजरातचा डाव २११ धावांवर आटोपला. विदर्भने दुसऱ्या डावात ४ बाद ८९ धावा केल्या आहेत.
ग्रुप बी
- बडोदा विरुद्ध सौराष्ट्र
- सौराष्ट्रने दुसऱ्या डावात २ बाद २३ धावा केल्या असून त्यांना सामना जिंकण्यासाठी १७७ धावांची गरज आहे.
- मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश -
पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. मुंबईने पहिल्या दिवशी ५ बाद ३७२ धावा केल्या आहेत. सर्फराज खान २२६ धावांवर नाबाद खेळत आहे. - मध्य प्रदेश विरुद्ध उत्तर प्रदेश -
मध्य प्रदेशचा पहिला डाव २३० धावांवर आटोपला. तेव्हा उत्तर प्रदेशने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २१६ धावा केल्या. या सामन्यात मध्य प्रदेशचा गोलंदाज रवी यादवने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक साधली. मध्य प्रदेशने दुसऱ्या डावात ३ बाद १०५ धावा केल्या आहेत. - रेल्वे विरुद्ध कर्नाटक -
रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १०६ धावा केल्या आहेत.
ग्रुप सी -
- ओडिशा विरुद्ध आसाम -
ओडिशाने पहिल्या डावात ४३६ धावा केल्या. तेव्हा प्रत्युत्तरादाखल आसामने ३ बाद ५९ धावा केल्या आहेत. - त्रिपूरा विरुद्ध महाराष्ट्र -
त्रिपूराच्या १२१ धावांच्या प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्रचा पहिला डाव २०८ धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाअखेर त्रिपूराने ३ बाद १६६ धावा केल्या आहेत. - छत्तीसगड विरुद्ध जम्मू काश्मिर -
पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. छत्तीसगडने पहिल्या दिवशी ४ बाद २७० धावा केल्या आहेत. - उत्तराखंड विरुद्ध हरियाणा -
पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी उत्तराखंडचा पहिला डाव १०९ धावांवर आटोपला. तेव्हा हरियाणाने ५ बाद ५० धावा केल्या आहेत. - सर्विसेस विरुद्ध झारखंड -
सर्विसेसने पहिल्या डावात २७९ धावा केल्या होत्या. तेव्हा झारखंडने आपल्या पहिल्या डावात ९ बाद १४५ धावा केल्या आहेत.
ग्रुप प्लेट -
- चंडीगढ विरुद्ध पाँडिचेरी -
पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी चंडीगढने पहिल्या डावात १३४ धावा केल्या. तेव्हा पाँडिचेरीने ४ बाद ३७ धावा केल्या आहेत. - गोवा विरुद्ध अरुणाचल प्रदेश -
गोवाने आपला पहिला डाव २ बाद ५८९ धावांवर घोषित केला. तर प्रत्युत्तरादाखल अरुणाचलचा संघ ८३ धावांवर ढेपाळला. तेव्हा गोवाने फॉलोऑन लादले असून अरुणाचलने दुसऱ्या डावात ३ बाद १९ धावा केल्या आहेत. - सिक्किम विरुद्ध मणिपूर -
सिक्किमने पहिल्या डावात १६९ धावा जोडल्या. तेव्हा मणिपूरचा संपूर्ण संघ ९१ धावांत गडगडला. सिक्किमने दुसऱ्या डावात २६६ धावा करत ३४५ धावांचे लक्ष्य मणिपूरला दिले आहे. दुसऱ्या डावात मणिपूरने बिनबाद ७ धावा केल्या आहेत. - नागालँड विरुद्ध मिझोराम -
नागालँडच्या पहिल्या डावातील २४३ धावांच्या प्रत्युत्तरादाखल मिझोरामने ३ बाद ३१८ धावा केल्या आहेत. - बिहार विरुद्ध मेघालय -
बिहारने पहिल्या डावात २०८ धावा केल्या. तेव्हा मेघालयाचा पहिला डाव १७९ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात बिहारने २ बाद ६७ धावा केल्या आहेत.