मुंबई - पाकिस्तान सुपर लीगच्या प्ले ऑफ सामन्यांना सुरुवात झाली आहे. पेशावर झाल्मी विरुद्ध लाहोर कलंदर यांच्यात सामना पार पडला. या सामन्यादरम्यान गमतीदार किस्सा पाहायला मिळाला.
पेशावर झाल्मी संघाने दिलेल्या १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी लाहोरचे कलंदर मैदानात उतरले. त्यांची सुरुवात देखील चांगली झाली. १२व्या षटकात मोहम्मद इमरानने पहिला चेंडू टाकला. यानंतर सामना अचानक थांबवण्यात आला आणि कलंदरचा फलंदाज मोहम्मद हाफीज अचानक ड्रेसिंग रुमच्या दिशेने धावत सुटला. नेमके काय घडले हे कुणालाच कळले नाही.
या ब्रेकच्या कालावधीत पेशावर संघाचे वहाब रियाज, इमाम उल हक आणि शोएब मलिक आपापसात चर्चा करत होते. तेव्हा स्पाईक कॅमेरा त्यांच्याजवळ थांबवण्यात आला. तेव्हा समालोचक रमीझ राजा यांनी त्यांच्याशी गप्पा मारण्यास सुरूवात केली. याच चर्चेत इमामने सामना थांबण्यामागचे कारण सांगितले.
रमीझ राजा यांनी हाफिजला टाईम आऊट का देत नाही असे विचारले. तेव्हा इमामने सांगितलं की, मागील दोन षटकांपासून हाफिज मला सांगत होता की मला सू सू करायला जायचं आहे. त्यामुळे तो गेला. इमामच्या तोंडून हे वाक्य ऐकताच रमीज राजा आणि शोएब-वहाब यांना हसू आवरलं नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, हाफिजने मैदानात आल्यानंतर आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत लाहोरच्या संघाला विजयपथावर आणले. त्याने ४६ चेंडूत ७४ धावा करत हाफीजने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. लाहोरने पेशावर संघावर ५ गडी राखून मात करत सामना जिंकला.
हेही वाचा - धोनीची जागा इशान किशन घेईल, निवड समितीच्या माजी प्रमुखांचे भाकित
हेही वाचा - सचिनने आजच्या दिवशी केले होते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण!