मुंबई - मुंबई आणि उत्तर प्रदेश या संघात विजय हजारे करंडक स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने वादळी खेळी करत इतिहास घडवला. तो विजय हजारे करंडक स्पर्धेच्या एका मोसमात ८०० धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे.
पृथ्वी शॉने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या २०२०-२१ या मोसमात खेळताना १६५.४० च्या सरासरीने आणि १३८.२९ च्या स्ट्राईक रेटने एकूण ८२७ धावा केल्या. अंतिम सामन्यात त्याने ३९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे, सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शॉला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला होता. यानंतर तो पुन्हा मैदानात उतरेल का नाही, याबाबत शंका होती. पण उत्तर प्रदेशचा डाव संपल्यानंतर पृथ्वी मैदानात उतरला आणि झंझावती खेळी केली.
विजय हजारे करंडक स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- ८२७ - पृथ्वी शॉ, २०२१
- ७३७ - देवदत्त पडीक्कल, २०२१
- ७२३ - मयांक अग्रवाल, २०१८
- ६०९ - देवदत्त पडीक्कल, २०१९
- ६०७ - दिनेश कार्तिक, २०१७
- ६१३ - रविकुमार समर्थ, २०२१
हेही वाचा - एकदिवसीय क्रिकेटवर मिताली 'राज', अशी कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू
हेही वाचा - IND Vs ENG २nd T0-२० : फलंदाजीत सुधारणेसह मालिकेत बरोबरी साधण्याचे भारतापुढे आव्हान