नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामातील सर्वात वयस्कर खेळाडू प्रविण तांबे आयपीएल खेळणार की नाही, याबद्दल साशंकता आहे. कारण, ४८ वर्षीय तांबे मागील वर्षी अबुधाबी आणि शारजाह येथे झालेल्या टी-१० स्पर्धेत खेळला होता. हा बीसीसीआयच्या नियमावलीचा भंग आहे. यामुळं त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने, १९ डिसेंबरला कोलकाता येथे पार पडलेल्या आयपीएल लिलावात प्रविण तांबेवर २० लाखांची बोली लावत संघात घेतले. तांबे यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य राहिला आहे. मात्र, तो १३ व्या हंगामात खेळू शकणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे.
प्रविण तांबेने मागील वर्षी अबुधाबी आणि शारजाह येथे झालेल्या टी-२० स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्याने या स्पर्धेत हॅट्ट्रिकही घेतली होती. इयॉन मॉर्गन, केरॉन पोलार्ड आणि फॅबियन एलेन या खेळाडूंना त्यानं माघारी धाडलं. होते. महत्वाची बाब म्हणजे, त्यानं ख्रिस गेल आणि उपुल तरंगा यांनाही त्या सामन्यात बाद केले होते. तांबेने त्या सामन्यात २ षटकात १५ धावा देत ५ गडी बाद केले होते.
याविषयी आयपीएल प्रशासकीय समितीचे चेअरमन बृजेश पटेल यांनी एका इंग्रजी संकेतस्थळाला सांगितलं की, 'बीसीसीआयच्या नियमानुसार, भारतीय खेळाडूने करार केल्यास तो टी-२० किंवा टी-२० स्पर्धा खेळू शकत नाही. तो एकदिवसीय, तीन दिवसीय आणि चार दिवसीय सामना खेळू शकतो. पण त्याला यासाठी परवानगी घ्यावी लागते. आम्ही तांबे प्रकरण गंभीरतेने घेतले असून याबद्दल निर्णय लवकरच घेतला जाईल.'
हेही वाचा - चॅपेल म्हणतात, 'कोहली-रोहितपेक्षा सचिन अन् गांगुलीने केलाय घातक गोलंदाजांचा सामना'
हेही वाचा - शमीचे 'फॅन' बनले गावस्कर, म्हणाले, शमीच्या गोलंदाजीमुळे मार्शलची आठवण येते