नवी दिल्ली - भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे मानधनाऐवजी आता अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकर हिला संघात स्थान देण्यात आले आहे.
![pooja vastrakar replace smriti mandhana against africa for one day series](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/d_fhhz4uiaamooc_0910newsroom_1570587430_1071.jpg)
हेही वाचा - फेडररने चाहत्यांच्या विनंतीवर बदलला प्रोफाइल फोटो; तुम्हीही म्हणाल क्या बात!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या सामन्यातील पहिला सामना बुधवारी बडोदा येथे रंगणार आहे. तत्पूर्वी, स्मृतीला रविवारी सरावादरम्यान, हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे तिला आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. स्मृती मानधना लयीत असल्याने, तिच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. मागील १८ सामन्यात खेळताना स्मृतीने ६७.८६ च्या सरासरीने १०१८ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.
नुकतीच पार पडलेली आफ्रिकेविरुध्दची ५ सामन्यांची टी-२० मालिका भारताने ३-१ ने जिंकली होती. या संपूर्ण मालिकेत स्मृती अवघ्या ४६ धावा करु शकली होती. स्मृतीला २०१८ ला आयसीसीचा 'सर्वोत्तम महिला एकदिवसीय खेळाडू' पुरस्कार मिळालेला असून तिने एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थानही पटकावले होते.
भारतीय संघ -
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, तानिया भाटीया, एकता बिस्त, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, दयालन हेमलता, मानसी जोशी, शिखा पांडे, पूनम यादव, प्रिया पुनिया, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा.
आफ्रिकेविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला सामना - ९ ऑक्टोबर, सकाळी ९ वाजल्यापासून.
- दुसरा सामना - ११ ऑक्टोबर, सकाळी ९ वाजल्यापासून.
- तिसरा सामना - ११ ऑक्टोबर, सकाळी ९ वाजल्यापासून.