ETV Bharat / sports

द. अफ्रिका, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तान पाठवणार ३० सदस्यीय संघ - पाकचा आफ्रिका दौरा २०२१ न्यूज

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी ३० सदस्यीय खेळाडूंचा संघ पाठवण्याचा विचारात आहे. याची माहिती पीसीबीमधील सूत्रांनी दिली.

pcb-planning-to-send-30-member-squad-for-twin-tours-of-south-africa-and-zimbabwe
द. अफ्रिका, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तान पाठवणार ३० सदस्यीय संघ
author img

By

Published : Mar 8, 2021, 6:59 PM IST

कराची - पाकिस्तान सुपर लीगच्या सहाव्या हंगामात ६ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तान बोर्डाने घेतला. आता पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी पीसीबीने एक योजना आखली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी ३० सदस्यीय खेळाडूंचा संघ पाठवण्याचा विचारात आहे. याची माहिती पीसीबीमधील सूत्रांनी दिली.

पीसीबीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना व्यवसायिक विमानाऐवजी चार्टर्ड विमानाने आफ्रिकेला पाठवण्यात येणार आहे. पीएसएलमध्ये खेळाडूंना कोरानाची लागण झाल्याचे समोर आल्याने, पीसीबी अधिक जोखीम पत्कारण्याच्या फंदात नाही.

दरम्यान, पाकिस्तानचा संघ आफ्रिका दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि चार टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. तर झिम्बाब्वे दौऱ्यात पाकचा संघ दोन कसोटी, ३ टी-२० सामने खेळणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने, एक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, लाहोरमधील आपले मुख्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व अधिकाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Mumbai Indians Schedule: IPL इतिहासातील सर्वात यशस्वी संघाचे सामने कधी, कोठे आणि कोणाविरुद्ध होणार

हेही वाचा - 'विराट, रोहित आहेत परंतु पंत सारखा खेळाडू मी अजूनपर्यंत पहिला नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.