कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक खेळाडू सरफराज अहमद एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्याने कायदे-आझम स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान, आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून सामन्याच्या फी मधील ३५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे.
सरफराज अहमद स्थानिक स्पर्धेत सिंध एकादश संघाचे नेतृत्व करत आहेत. शनिवारी झालेल्या सामन्यादरम्यान, त्याने आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. ही बाब समोर आली. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सरफराजने आपली चूक मान्य केली आहे.
याविषयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, 'सरफराजने सामन्यादरम्यान, आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. त्याने पंचाच्या निर्णयावर टिप्पणी करताना, हे कृत्य केले. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याच्या सामन्याच्या फी मधील ३५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे.
हेही वाचा - IPL २०२० : विराटसारखा खेळाडू कर्णधारपदावर असणे हे आमचे भाग्यचं; 'यांनी' केली कोहलीची पाठराखण
हेही वाचा - भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा: विराट दोन कसोटीतून घेणार माघार?; 'हे' आहे कारण...