मुंबई - कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून, आगामी काळात होणार्या सर्व स्पर्धा स्थगित किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरावासाठी अधिक वेळ बाहेर राहणार्या खेळाडूंना आता घरीच थांबावे लागले आहे. भारतीय संघाचे अष्टपैलू खेळाडू हार्दिक आणि कृणाल पांड्या सद्या घरीच आहे. लॉकडाऊन काळात कृणालने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
कृणालने शेअर केलेल्या व्हिडिओत, तो हार्दिकसोबत घरामध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे. यासोबत तो लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका, असे आवाहन करताना दिसत आहे.
व्हिडिओच्या माध्यमातून पांड्या ब्रदर्स म्हणतात, की 'सुरक्षित राहा. घराबाहेर पडू नका. आम्ही आमच्या कुटुंबासोबत घरातच आहोत. आम्ही सर्वांना आग्रह करतो की, तुम्हीही घराबाहेर न पडता लॉकडाऊनचे पालन करा आणि कोरोनाचा प्रसार होण्यास रोखा.'
-
We can have fun indoors too 😊 Please stay home and be safe everyone 🤗 @hardikpandya7 pic.twitter.com/bje9m5n99j
— Krunal Pandya (@krunalpandya24) March 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We can have fun indoors too 😊 Please stay home and be safe everyone 🤗 @hardikpandya7 pic.twitter.com/bje9m5n99j
— Krunal Pandya (@krunalpandya24) March 29, 2020We can have fun indoors too 😊 Please stay home and be safe everyone 🤗 @hardikpandya7 pic.twitter.com/bje9m5n99j
— Krunal Pandya (@krunalpandya24) March 29, 2020
दरम्यान, याआधी भारताच्या बहुतांश खेळाडूंनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातले असून सुमारे १७९ देशांना याचा फटका बसला आहे. जगभरात या कोरोना विषाणूमुळे २९ हजार ९५७ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून १ हजार ७१ वर पोहोचली आहे. यातील ९२४ रुग्ण अॅक्टिव्ह स्टेजमध्ये म्हणजेच कोरोना संसर्ग झालेले आहेत. तर ९९ जर पूर्णत: बरे झाले असून २९ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सुधारित आकडेवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा - अमेरिकेत असूनही देशाच्या मदतीसाठी धावला साकिब, घेतली २००० कुटुंबांची जबाबदारी
हेही वाचा - कोरोना : ऑस्ट्रेलिया 'बॉर्डर' बंद, टी-२० विश्वकरंडकासह भारताचा दौरा अडचणीत