ETV Bharat / sports

धक्कादायक..! कोरोनामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा मृत्यू - जफर सर्फराज

पाकिस्तानचे माजी प्रथम क्षेणी क्रिकेटपटू जफर सर्फराज यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पेशावर येथील खाजगी रुग्णालयात ५० वर्षीय जफर मागील तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते.

pakistani first class cricketer zafar sarfraz dies to coronavirus in peshawar
धक्कादायक..! कोरोमुळे माजी क्रिकेटपटूचा मृत्यू
author img

By

Published : Apr 14, 2020, 10:46 AM IST

पेशावर - कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून जवळपास सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान क्रीडा क्षेत्रातून एक वाईट बातमी आली आहे. पाकिस्तानचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू जफर सर्फराज यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ५० वर्षीय जफर पेशावर येथील खाजगी रुग्णालयात, मागील तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते.

जफर कोरोनाशी झुंज देताना मृत्यू पावलेले पहिले व्यावसायिक क्रिकेटपटू ठरले. पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अख्तर सर्फराज यांचे जफर हे भाऊ होते. अख्तर सर्फराज यांचे १० महिन्यापूर्वी कर्करोगामुळे निधन झाले आहे.

जफर यांनी १९८८ मध्ये क्रिकेट करिअरला सुरुवात केली. त्यांनी पेशावरसाठी १५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६१६ धावा केल्या आहेत. शिवाय त्यांनी सहा एकदिवसीय सामन्यांत खेळताना ९६ धावा केल्या. १९९४ मध्ये त्यांनी निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्यांनी पेशावरच्या १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. २००० साली त्यांनी सिनिअर संघासाठी सेवा पुरवली.

याआधी कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रातून स्वित्झर्लंडचे दिग्गज आईस हॉकीपटू रॉजर चॅप्पोट, स्पेनमधील फुटबॉल संघाचा प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया, पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॅश खेळाडू आजम खान, इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट संघाचे अध्यक्ष डेव्हिड हॉजकिस, फ्रान्सच्या ऑलिम्पिक डी मार्शल फुटबॉल क्लबचे माजी अध्यक्ष पेप दिऑफ आणि इटलीचे प्रसिद्ध ऑलिम्पिक धावपटू दोनातो साबिया यांचे निधन झाले आहे.

दरम्यान, पाकिस्तानात आतापर्यंत ५५०० कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी ७४४ रुग्ण हे पेशावर शहरातील खैबर पखतुख्वा भागातील आहेत. पाकमध्ये सुमारे १०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - कोरोना रुग्णांसमोर पाकिस्तानी डॉक्टर्सचा डान्स; गंभीरने शेअर केला व्हिडिओ

हेही वाचा - कोरोनामुळे पुनरागमनाच्या चूकीच्या आशा निर्माण करु शकत नाही – डिव्हिलियर्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.