कराची - पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला २६ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. २००९ साली लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमला जाताना श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर तब्बल १० वर्ष कोणत्याही संघांनी पाकिस्तानचा दौरा केला नव्हता. २०१९ मध्ये श्रीलंकेच्या संघाने प्रथम दौरा केला. यानंतर आता आफ्रिकेचा संघ हल्ल्यानंतर प्रथमच पाकिस्तान दौऱ्यावर आहे.
उभय संघातील पहिला कसोटी सामना कराची येथील नॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना रावलपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये होईल. यानंतर तीन टी-२० सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळली जाणार आहेत.
हेड टू हेड रेकॉर्ड -
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिल्यास आफ्रिकेचा पगडा भारी आहे. उभय संघात आतापर्यंत २६ कसोटी सामने झाली आहेत. यात तब्बल १५ सामने आफ्रिकेने जिंकली आहेत. तर पाकिस्तानला ४ सामन्यात विजय मिळवला आला आहे. राहिलेले ७ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
![pakistan vs south africa test series](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10364002_head-to-head.jpg)
दरम्यान, उभय संघातील कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवली जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल आहे. तर दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा संघ आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
![pakistan vs south africa test series](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10364002_pak-vs-sa.jpg)
हेही वाचा - सर्वोत्तम कर्णधार कोण ? कोहली की रहाणे, टी नटराजन म्हणतो..
हेही वाचा - IPL २०२१ : राजस्थान रॉयल्स संघात संगकाराची एन्ट्री; मिळाली 'ही' जबाबदारी