ETV Bharat / sports

आयपीएलपेक्षा ६ पटीने कमी आहे पाकिस्तानच्या टी-२० लीगच्या बक्षीसाची रक्कम!

इंडियन टी-२० लीगच्या इंडियन प्रीमियर लीगच्या विजयी संघाला सुमारे २० कोटी रुपये मिळतात, जे पीएसएलच्या तुलनेत ६ पटीने अधिक आहे. पीएसएलचा हा पाचवा हंगाम आहे. या स्पर्धेत अंदाजे ५ लाख यूएस डॉलर दिले जातील.

pakistan super league aanounced prize money for new season
आयपीएलपेक्षा ६ पटीने कमी आहे पाकिस्तानच्या टी-२० लीगची बक्षीस रक्कम!
author img

By

Published : Feb 19, 2020, 8:32 PM IST

कराची - पाकिस्तान टी-२० लीग पाकिस्तान सुपर लीगची (पीएसएल २०२०) या हंगामातील बक्षीसाची रक्कम जाहीर झाली आहे. पीएसएलचा हा पाचवा हंगाम आहे. या स्पर्धेत अंदाजे ५ लाख यूएस डॉलर दिले जातील. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे ३.५० कोटी आहे. तर, १.४५ कोटी रुपये उपविजेत्याला देण्यात येतील.

हेही वाचा - चेतेश्वर पुजारा इंग्लंडसाठी खेळणार!

इंडियन टी-२० लीगच्या इंडियन प्रीमियर लीगच्या विजयी संघाला सुमारे २० कोटी रुपये मिळतात, जे पीएसएलच्या तुलनेत ६ पटीने अधिक आहे. पाकिस्तान सुपर लीगचा पाचवा हंगाम फक्त पाकिस्तानमध्ये खेळवला जाईल. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा पाकिस्तानमध्ये संपूर्ण स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

२००८ मध्ये एशिया कप ही पाकिस्तानमधील शेवटची स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग आणि युएईच्या संघांनी भाग घेतला होता. पीएसएलच्या नव्या मोसमात इस्लामाबाद युनायटेड, कराची किंग, लाहोर कलंदर, मुलतान सुल्तान, पेशावर झल्मी आणि क्वेटा ग्लेडिएटर्स हे ६ संघ सहभागी होणार आहेत. नवीन हंगाम २० फेब्रुवारीपासून सुरू होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.