ETV Bharat / sports

पाकिस्तानी खेळाडूनों, आता बिर्याणी विसरा...पीसीबीचा निर्णय - PCB

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक वसीम खान यांनी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्टची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट जे आहार खेळाडूंना सांगेल तोच आहार खेळाडूंना घ्यावा लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना आता बिर्याणी खायला मिळणार नाही. न्यूट्रिशनिस्टकडून डाळ-भात आणि भाज्यांवर जास्त भर देण्यात येणार आहे.

पाकिस्तानी खेळाडूनों, आता बिर्याणी विसरा...पीसीबीचा निर्णय
author img

By

Published : Aug 6, 2019, 10:27 AM IST

कराची - विश्वकरंडक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या संघाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. यामुळे स्पर्धेनंतर संघात अनेक बदल करण्यात येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्या बदलांच्या दृष्टीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पहिला बदल म्हणून बोर्डाने, पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसबाबत नियमावली तयार केली आहे. यामध्ये यापुढे खेळाडूंना बिर्याणी खाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

भारत विरुध्द पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद मैदानात अनेक वेळा जांभई देताना दिसून आला. सरफराजची अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. त्यानंतर तर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने तर सरफराजचा चांगलाच समाचार घेतला. त्याने असा पोट सुटलेला कर्णधार मी कधी पाहिला नाही, अशी टीका त्यांनी केली.

सरफराजसह संघातील अनेक खेळाडू इंग्लंडमध्ये एका पार्टीमध्ये फास्ट फूट खात असतानाचे फोटोही व्हायरल झाले होते. माजी खेळाडूंनी संघातील खेळाडू फिटनेसबाबत जागृत नसल्याची टीका केली होती. या सर्व कारणाने पीसीबीने खेळाडूंच्या फिटनेसबाबत जोर देण्यास सुरुवात केली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.