कराची - पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज फिरकीपटू म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कादिर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कादिर हे ६३ वर्षांचे होते. पाकिस्तानच्या माध्यमांनी याविषयी माहिती दिली.
हेही वाचा - 'यॉर्कर किंग' मलिंगाचा चौकार, सलग चार गडी केले बाद
पाकिस्तानसाठी कादिर ६७ सामने खेळले होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर २३६ बळी आहेत. कादिर हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही राहिले होते. १९७०-८० च्या दशकात कादिर हे संघातील एक प्रबळ गोलंदाज म्हणून ओळखले जात होते. कादिर यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची बातमी दिली.
-
PCB pays tribute to Abdul Qadir
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More ▶️ https://t.co/YexDe2BrfN pic.twitter.com/Vouc7y1J3w
">PCB pays tribute to Abdul Qadir
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 6, 2019
More ▶️ https://t.co/YexDe2BrfN pic.twitter.com/Vouc7y1J3wPCB pays tribute to Abdul Qadir
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 6, 2019
More ▶️ https://t.co/YexDe2BrfN pic.twitter.com/Vouc7y1J3w
येत्या १५ सप्टेंबरला कादिर यांचा ६४वा वाढदिवस होता. पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्या आवडत्या गोलंदाजांपैकी ते एक होते. कादिर यांनी १९७७ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीतील पदार्पण केले. त्यांनी कसोटीत २३६ बळी घेतले होते. ६५ धावांत ९ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.
पाकिस्तान क्रिकेटसाठी आजतागायत ही कामगिरी सर्वोत्तम मानली जाते. १०४ एकदिवसीय सामन्यात त्यांनी १३२ विकेट्स घेतले आहेत. १९९३ मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.