ETV Bharat / sports

कोरोनामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अद्याप प्रायोजकाच्या प्रतीक्षेत - sponsor to pakistan team news

एका वृत्तसंस्थेनुसार, सद्यस्थिती लक्षात घेता मंडळाला तीन वर्षांच्या कराराऐवजी एक वर्षाचा करार करावा लागू शकतो. पीसीबीने नुकत्याच केलेल्या प्रायोजकतेच्या बोली प्रक्रियेदरम्यान केवळ एका कंपनीने रस दाखवला आहे. परंतू ही कंपनी पूर्वीच्या कराराच्या केवळ 30 टक्के रकमेचा विचार करत होती.

pakistan cricket board has not received sponsor yet
कोरोनामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अद्याप प्रायोजकाच्या प्रतीक्षेत
author img

By

Published : Jul 13, 2020, 12:14 PM IST

लाहोर - कोरोना व्हायरसने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. पीसीबीला अद्याप आपल्या वरिष्ठ पुरुष संघासाठी कोणताही प्रायोजक मिळालेला नाही. एका पेय कंपनीचा शेवटचा करार संपल्यापासून पीसीबीला कोणताही नवीन प्रायोजक मिळालेला नाही.

एका वृत्तसंस्थेनुसार, सद्यस्थिती लक्षात घेता मंडळाला तीन वर्षांच्या कराराऐवजी एक वर्षाचा करार करावा लागू शकतो. पीसीबीने नुकत्याच केलेल्या प्रायोजकतेच्या बोली प्रक्रियेदरम्यान केवळ एका कंपनीने रस दाखवला आहे. परंतू ही कंपनी पूर्वीच्या कराराच्या केवळ 30 टक्के रकमेचा विचार करत होती.

सध्या पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये आहे, जिथे त्यांना तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानी खेळाडूंच्या जर्सीवर शाहिद आफ्रिदी फाउंडेशनचा लोगो असेल.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने स्वत: याबाबत माहिती दिली. "शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो पाकिस्तानच्या क्रिकेट किटवर छापला जाईल याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. कारण आम्ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चॅरिटी पार्टनर आहोत. वसीम खानचे आभार आणि पीसीबीच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आमच्या संघाला इंग्लंड दौऱ्यासाठी शुभेच्छा", असे आफ्रिदीने ट्विट केले आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना मॅंचेस्टर येथे 5 ते 9 ऑगस्ट, दुसरा सामना एजेस बाऊलमध्ये 13 ते 17 ऑगस्ट आणि तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान साऊथम्प्टन येथे खेळला जाईल. यानंतर दोन्ही संघ 28, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.