लाहोर - भारतीय सलामीवीर रोहित शर्मा हा माझा आदर्श असून मला त्याच्यासारखी फलंदाजी करायची आहे, असे मत पाकिस्तानचा उदयोन्मुख फलंदाज हैदर अलीने व्यक्त केले. पाकिस्तान क्रिकेटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात हैदरने आपली प्रतिक्रिया दिली.
१९ वर्षीय हैदर म्हणाला, "रोहित शर्मा माझा आदर्श आहे. त्याची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्याचा स्ट्राइक रेट चांगला आहे. मला माझ्या खेळात हेच पाहिजे आहे आणि मला त्याच्यासारखी फलंदाजी करायची आहे."
हैदरने अलीकडे स्थगित करण्यात आलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झल्मीकडून खेळताना नऊ सामन्यांमध्ये २३९ धावा केल्या होत्या. यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजाने हैदरची तुलना बाबर आझम आणि विराट कोहलीशी केली होती.