ETV Bharat / sports

IND vs BAN : पाकिस्तानचा बांगलादेशवर १ डाव आणि ४४ धावांनी विजय - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश

चौथ्या दिवशी ६ बाद १२६ धावांवरून बांगलादेशने पुढे खेळण्यास केली. मात्र त्यांचा खेळ ९० मिनिटेच चालला. कर्णधार मोमिनूल हकने ४१ धावांचे योगदान दिले. पाकच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ ढेपाळला.

PAK VS BAN 1st test : Pakistan won by an innings and 44 runs
IND vs BAN : पाकिस्तानचा बांगलादेशवर डावाने विजय
author img

By

Published : Feb 11, 2020, 8:06 AM IST

Updated : Feb 11, 2020, 9:44 AM IST

रावळपिंडी - पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात १ डाव आणि ४४ धावांनी विजय मिळवला. पाकने चौथ्याच दिवशी सकाळच्या सत्रात सामना जिंकला आणि दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बांगलादेशचा दुसरा डाव १६८ धावांत आटोपला.

चौथ्या दिवशी ६ बाद १२६ धावांवरून बांगलादेशने पुढे खेळण्यास केली. मात्र त्यांचा खेळ ९० मिनिटेच चालला. कर्णधार मोमिनूल हकने ४१ धावांचे योगदान दिले. पाकच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ ढेपाळला. फिरकीपटू यासीर शाहने चार बळी घेतले. सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवणारा नसीम शाह सामनावीर ठरला.

PAK VS BAN 1st test : Pakistan won by an innings and 44 runs
पाकिस्तानचा संघ विजयानंतर

दरम्यान, पाकिस्तानने या विजयाबरोबरच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ६० गुणांची कमाई केली. आता त्यांचे एकूण १४० गुण झाले आहेत. भारत गुणातालिकेत अव्वल स्थानावर आहे. उभय संघातील दुसरी कसोटी सामना ५ एप्रिलपासून आहे.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश (पहिला डाव) ८२.५ षटकांत सर्वबाद २३३
पाकिस्तान (पहिला डाव) : सर्वबाद ४४५ (बाबर आझम १४३, शान मसूद १००, हॅरिस सोहेल ७५, असद शफिक ६५, अबू जायेद ८६/३, रुबेल हुसेन ३/११३)
बांगलादेशचा (दुसरा डाव) : ६२.२ षटकांत सर्वबाद १६८ (मोमिनूल हक ४१, नजमूल हुसेन शांतो ३८, तमिम इक्बाल ३४, लिटॉन दास २९, नासीम शाह ४/२६, यासीर शाह ४/५८)

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Feb 11, 2020, 9:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.