लाहोर - पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने शुक्रवारी विश्वचषकात होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, पुलवामा हल्ल्यानंतर क्रिकेटला निशाणा केला जात आहे. दोन्ही संघात होणारा नियोजित सामना व्हायला पाहिजे. दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सर्फराजने म्हटले आहे.
पाकिस्तानी कर्णधाराने पुढे सांगितले की, क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना व्हायला हवा. राजकीय हेतूने क्रिकेटला टारगेट करुन नये. पाकिस्तानने खेळात कधीच राजकारण आणले नसल्याचे सर्फराजने सांगितले.
पुलवामा येथे हल्ला झाल्यानंतर विश्वचषकात भारत-पाक यांच्यात होणाऱ्या सामन्यात भारताने खेळावे की नाही यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही खेळाडूंनी सामना व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे तर काहींनी विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत.