चेन्नई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बंगळुरूचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कलने कोरोनावर मात केली आहे. तो संघासोबत जोडला गेला आहे. आरसीबीने याची माहिती दिली.
आरसीबीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पडीक्कल याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात पडीक्कल आपल्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.
पडीक्कल काय म्हणाला...
माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. दोन आठवड्यांपूर्वी माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. बीसीसीआय आणि आयपीएलच्या प्रोटोकॉलनुसार, मी घरात दोन आठवड्याासाठी क्वारंटाईन होतो. उपचारानंतर माझी दोन वेळा चाचणी करण्यात आली. यात मी दोन्ही वेळा निगेटिव्ह आलो आहे. निगेटिव्ह आल्यानंतर मी संघासोबत जोडलो गेलो असून मला छान वाटत आहे, असे पडीक्कल म्हणाला.
-
Bold Diaries: Devdutt Padikkal joins the RCB camp after testing negative for COVID-19. He’s healthy, feeling better and raring to go. Here’s a message to all RCB fans from Devdutt.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/BtVszNABJW
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bold Diaries: Devdutt Padikkal joins the RCB camp after testing negative for COVID-19. He’s healthy, feeling better and raring to go. Here’s a message to all RCB fans from Devdutt.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/BtVszNABJW
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 7, 2021Bold Diaries: Devdutt Padikkal joins the RCB camp after testing negative for COVID-19. He’s healthy, feeling better and raring to go. Here’s a message to all RCB fans from Devdutt.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/BtVszNABJW
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 7, 2021
पडीक्कल निगेटिव्ह आल्याने तो आता शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो. दरम्यान, पडीक्कलने आयपीएलच्या तेराव्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने १५ सामन्यात ४७३ धावा जमवल्या होत्या. पडीक्कल संघाला चांगली सुरूवात करून देण्यात यशस्वी ठरला होता.
डॅनियल सॅम्सला कोरोनाची लागण -
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू डॅनियल सॅम्सला कोरोनाची लागण झाली आहे. याची पृष्टी आरसीबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. आरसीबीने या विषयावरून एक ट्विट केले आहे. यात त्यांनी, डॅनियल सॅम्स चेन्नईत ३ एप्रिल रोजी दाखल झाला. तेव्हा त्याची चाचणी करण्याती आली, यात तो निगेटिव्ह आला. दुसऱ्या चाचणी ७ एप्रिलला करण्यात आली, यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे, असे म्हटलं आहे.
हेही वाचा - VIDEO : आगरी गाण्यावर मुंबई पलटणचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा - IPL २०२१ : 'या' खेळाडूने आयपीलच्या पावर प्लेमध्ये ठोकली सर्वाधिक अर्धशतके