चेन्नई - आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आहे. मुंबईने रोहितच्या नेतृत्वात ५ वेळा स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. यंदाच्या हंगामात देखील मुंबईचा संघ विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मुंबईला कोणता संघ कडवे आव्हान देऊ शकतो, हे सांगितलं आहे.
आकाश चोप्रा म्हणाला की, 'दिल्ली कॅपिटल्सचा संघ श्रेयय अय्यरच्या अनुपस्थित देखील मुंबई इंडियन्ससमोर कडवे आव्हान निर्माण करू शकतो.'
यंदाच्या हंगामात दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंत करणार आहे. दिल्लीच्या संघात शिखर धवन, आर. अश्विन आणि स्मिथ सारखे अनुभवी खेळाडू असताना देखील व्यवस्थापनाने पंतवर विश्वास दर्शवला आहे. दरम्यान, दिल्लीचा संघ मागील हंगामात उपविजेता ठरला होता.
दिल्लीचा संघ मजबूत दिसत आहे. हा संघ माझा फेवरेट देखील आहे. आयपीएल २०२१ मध्ये मुंबई संघाला कोणता संघ टक्कर देऊ शकतो तर तो दिल्लीचा संघ आहे. दिल्लीच्या संघात अनेक मॅच विनर्स खेळाडू आहेत. ते आपल्या संघाच्या विजयात योगदान देऊ शकतात, असेही आकाश चोप्रा म्हणाला.
दरम्यान, दिल्लीचा संघ आयपीएल २०२१ मध्ये सलामीचा सामना १० एप्रिल रोजी खेळणार आहे. दिल्लीचा संघ मुंबई इंडियन्स सोबत दोन हात करणार आहे. यात कोणता संघ बाजी मारणार यांची उत्सुकता आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : RCBसाठी आनंदाची बातमी, 'हा' खेळाडू संघात परतला
हेही वाचा - IPL २०२१ : बुमराह इज बॅक, आयपीएलपूर्वी संघांना दिली चेतावणी