मुंबई - क्रिकेट विश्वात आपल्या अफलातून स्टाईलमुळे प्रसिद्ध असलेले पंच बिली बाउडन यांचा आज वाढदिवस. मैदानात त्यांना हटके स्टाईलमध्ये एखादा निर्णय देताना पाहून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही आपसूक हसू उमटतं. त्यांच्या स्टाईलमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होते, यामुळे बिली सगळ्यांचे आवडते पंच म्हणून ओळखले जातात. आज बिली आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
-
Happy birthday to one of cricket's most beloved umpires – Billy Bowden 🎂 pic.twitter.com/TQ7ied0Qim
— ICC (@ICC) April 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy birthday to one of cricket's most beloved umpires – Billy Bowden 🎂 pic.twitter.com/TQ7ied0Qim
— ICC (@ICC) April 11, 2020Happy birthday to one of cricket's most beloved umpires – Billy Bowden 🎂 pic.twitter.com/TQ7ied0Qim
— ICC (@ICC) April 11, 2020
आयसीसीने बिली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ट्विटरवरुन दिल्या आहेत. तर चाहत्यांनीही आपल्या आवडत्या पंचावर शुभेच्छाचा भरभरून वर्षाव केला आहे. यातील एका हौशी चाहत्याने तर बिली यांच्या प्रेरणेतून, असे सांगत 'देशी बिली बाउडन'चा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ मजेशीर असून व्हिडिओतील 'गोट्या' पंच निर्णय देताना, डान्स करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवरुन क्रिकेट चाहत्यांमध्ये बिली यांची असलेल्या 'क्रेझ' याची प्रचिती येते.
-
Inspired by Sir Billy bowden , #HappyBirthdayBilly pic.twitter.com/SiG3GI7YBJ
— Shivam Sharma (@SharmaJiKaTweet) April 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Inspired by Sir Billy bowden , #HappyBirthdayBilly pic.twitter.com/SiG3GI7YBJ
— Shivam Sharma (@SharmaJiKaTweet) April 11, 2020Inspired by Sir Billy bowden , #HappyBirthdayBilly pic.twitter.com/SiG3GI7YBJ
— Shivam Sharma (@SharmaJiKaTweet) April 11, 2020
आयसीसीने शेअर केलेल्या फोटोमध्ये बिली बाउडन त्यांच्या हटके स्टाईलने निर्णय देताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, बिली यांनी त्यांची आगळीवेगळी स्टाईल जपताना पंचगिरीवर कोणताही परिणान होऊ दिला नाही. त्यांनी आपल्या करिअरमध्ये ८४ कसोटी, २०० एकदिवसीय आणि २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली आहे.
हेही वाचा - कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी लंकेचे क्रिकेट मंडळ पुढे सरसावले
हेही वाचा - सचिन इतका परफेक्ट होता की त्याला बाद करणे अवघड असायचे, क्लार्कची कबुली