दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ओमानचा खेळाडू युसूफ अब्दुर्रहीम अल बलुशीवर सात वर्षांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घातली आहे. सामना फिक्सींग करण्याच्या प्रयत्नात गुंतल्याबद्दल आयसीसीने ही कारवाई केली आहे.
हेही वाचा - यशस्वी जयस्वाल 'हिट' तर, अर्जुन तेंडुलकर 'फ्लॉप'
अल बलुशीने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केलेले चार आरोप स्वीकारले आहेत. हे सर्व आरोप संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या २०१९ च्या पुरुष टी-२० विश्व करंडक पात्रता स्पर्धेशी संबंधित आहेत.
सामना फिक्स करणे किंवा त्यासाठी सहकार्य करणे आणि फिक्सिंगला उत्तेजन देणे या अंतर्गत बलूशी दोषी आढळला आहे. २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर बलूशी हा ओमानकडून सातत्याने खेळला नव्हता.