ख्राईस्टचर्च - केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा १ डाव आणि १७६ धावांनी धुव्वा उडवत २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवले. या कामगिरीसह न्यूझीलंडचा संघ प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला आहे. इतकेच नव्हे तर न्यूझीलंडने मायदेशात सलग सहा कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम देखील आपल्या नावे केला आहे. तसेच न्यूझीलंडने मायदेशात खेळताना मागील १७ सामन्यात अपाराजित होण्याची मालिका कायम ठेवली आहे.
-
🇳🇿 NEW ZEALAND ARE NO.1️⃣🎉
— ICC (@ICC) January 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Victory over Pakistan has sent Kane Williamson's side to the 🔝 of the @MRFWorldwide ICC Test Team Rankings!
They have achieved the feat for the first time in rankings history 👏 pic.twitter.com/8lKm6HebtO
">🇳🇿 NEW ZEALAND ARE NO.1️⃣🎉
— ICC (@ICC) January 6, 2021
Victory over Pakistan has sent Kane Williamson's side to the 🔝 of the @MRFWorldwide ICC Test Team Rankings!
They have achieved the feat for the first time in rankings history 👏 pic.twitter.com/8lKm6HebtO🇳🇿 NEW ZEALAND ARE NO.1️⃣🎉
— ICC (@ICC) January 6, 2021
Victory over Pakistan has sent Kane Williamson's side to the 🔝 of the @MRFWorldwide ICC Test Team Rankings!
They have achieved the feat for the first time in rankings history 👏 pic.twitter.com/8lKm6HebtO
पाकिस्तानने पहिल्या डावात २९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने केन विल्यमसन व हेन्री निकोलस यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. दोघांनी ३६९ धावांची भागिदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. निकोलस २९१ चेंडूंत १८ चौकार व १ षटकारासह १५७ धावा केल्या. दुसरीकडे विल्यमसनने ३६४ चेंडूंत २८ चौकारांसह २३८ धावांची खेळी साकरली. डॅरील मिचेलने ११२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०२ धावा केल्या. तेव्हा विल्यमसनने ६ बाद ६५९ धावांवर डाव घोषित केला. न्यूझीलंडला पहिल्या डावात ३६२ धावांची आघाडी मिळाली.
-
👏👏👏
— ICC (@ICC) January 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
New Zealand win the #NZvPAK Test series 2-0!pic.twitter.com/i1kpzTRhxq
">👏👏👏
— ICC (@ICC) January 6, 2021
New Zealand win the #NZvPAK Test series 2-0!pic.twitter.com/i1kpzTRhxq👏👏👏
— ICC (@ICC) January 6, 2021
New Zealand win the #NZvPAK Test series 2-0!pic.twitter.com/i1kpzTRhxq
कायले जेमिन्सनच्या माऱ्यासमोर पहिल्या डावाप्रमाणेच पाकिस्तानचा दुसरा डावही गडगडला. जेमिन्सनने सहा गडी बाद केले. तर ट्रेंट बोल्टने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. पाकिस्तानच्या एकही फलंदाजाला पन्नासचा आकडा गाठता आला नाही. पाककडून सर्वाधिक धावा अझर अली आणि जफर गोहरने केल्या. दोघांनी प्रत्येकी ३७ धावा जमवल्या. कायले जेमिन्सन सामनावीर तर केन विल्यमसन मालिकावीर ठरला.
-
New Zealand win by an innings and 176 runs 🌟
— ICC (@ICC) January 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
An all-round performance has helped 🇳🇿 to a big victory over Pakistan in the second Test.
They take the series 2-0 👏 pic.twitter.com/SuySqGLpHe
">New Zealand win by an innings and 176 runs 🌟
— ICC (@ICC) January 6, 2021
An all-round performance has helped 🇳🇿 to a big victory over Pakistan in the second Test.
They take the series 2-0 👏 pic.twitter.com/SuySqGLpHeNew Zealand win by an innings and 176 runs 🌟
— ICC (@ICC) January 6, 2021
An all-round performance has helped 🇳🇿 to a big victory over Pakistan in the second Test.
They take the series 2-0 👏 pic.twitter.com/SuySqGLpHe
हेही वाचा - नटराजन, सैनी आणि शार्दुल यापैकी कोणाला संघात खेळताना पाहायला आवडेल, प्रशिक्षक काय म्हणाले...
हेही वाचा - सिडनीत टीम इंडियाला विजयाची ४३ वर्षांपासून प्रतिक्षा, रहाणे 'ब्रिगेड'वर नजरा