नवी दिल्ली - इंग्लंडविरुध्दची २ सामन्याची कसोटी मालिका यजमान न्यूझीलंडने १-० ने जिंकली. उभय संघातील दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. अखेरच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन(१०४) आणि रॉस टेलर (१०५) यांनी नाबाद शतकी खेळी केली. याच खेळींच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱया डावात १४० धावांची आघाडी उभारली. दरम्यान, पंचानी हा सामना प्रतिकूल हवामानामुळे अनिर्णीत ठेवल्याची घोषणा केला.
![NZ vs Eng: Williamson, Taylor score centuries as second Test is drawn](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5255463_ehh.jpg)
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत टॉम लाथमच्या शतकी खेळीच्या जोरावर आपला पहिला डाव ३७५ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने जोरदार उत्तर दिले. ज्यो रुट आणि रोरी बर्न्स या दोघांनी दमदार शतक झळकावले. याच खेळींच्या जोरावर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ४७६ धावा करु शकला.
दुसऱ्या डावात न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. सलामीवीर जोडी स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि भरवशाचा फलंदाज रॉस टेलर यांनी नाबाद शतकी खेळी करत सामना अनिर्णीत राखला. न्यूझीलंडने दुसऱया डावात २ बाद २४१ धावा करत १४० धावांची आघाडी घेतली होती. तेव्हा प्रतिकूल हवामानामुळे, पंचांनी दुपारच्या सत्रात सामना अनिर्णित ठेवण्याची घोषणा केली.
हेही वाचा - मनीष पांडेची नवी इनिंग.. 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत अडकला लग्नाच्या बेडीत
हेही वाचा - आगामी विश्वकरंडक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, अंधेरीच्या क्रिकेटपटूची संघात 'एन्ट्री'
हेही वाचा - थरारक!..शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात कर्नाटक विजयी