लाहोर - सलामीच्या फलंदाजीची व्याख्या बदलणारा फलंदाज हा वीरेंद्र सेहवाग नसून पाकचा शाहीद आफ्रिदी होता, असे वक्तव्य पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसिम अक्रमने केले आहे. अक्रमने यू-ट्यूब चॅनेलवरील एका व्हिडिओमध्ये हे विधान केले.
कसोटी क्रिकेटमध्ये सेहवाग नंतर आला. मात्र, १९९९-२०००च्या दरम्यान शाहीद आफ्रिदीने सलामी फलंदाजीची मानसिकता बदलली. मी जर त्याच्यासमोर असतो, तर मी त्याला बाद केले असते. पण, त्याने मला चौकारही ठोकले असते, असे तो म्हणाला.
आफ्रिदी १९९९-२०००मध्ये भारत दौर्यावर आलेल्या पाकिस्तान संघात सहभागी होणार नव्हता. मी इम्रान खानला सांगितले होते, की आपण आफ्रिदीला भारत दौऱ्यावर घेऊन जायले हवे, मात्र काही निवडकर्ते नाखुष होते. तेव्हा इम्रानने त्याला सलामी फलंदाजी करायला सांगितले होते, असा खुलासा अक्रमने आपल्या व्हिडिओमध्ये केला आहे.