ऑकलंड - न्यूझीलंडचा क्रिकेट संघ आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेपासून करणार आहे. तीन सामन्यांची टी-२० मालिका २७ नोव्हेंबरपासून सुरू होईल. ईडन पार्क येथे विंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना खेळवला जाईल. त्यानंतर दोन्ही संघ ३ ते १५ डिसेंबरदरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतील.
वेस्ट इंडिजशिवाय पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे संघ येत्या काही महिन्यांत न्यूझीलंड दौरा करतील. न्यूझीलंडबरोबर तीन टी-२० सामने वगळता १८ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान पाकिस्तान दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळेल. पाकिस्तानविरुद्ध बे ओव्हल येथे होणारा कसोटी सामना न्यूझीलंडमधील आठवा बॉक्सिंग-डे कसोटी सामना असेल.
फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे संघ न्यूझीलंड दौऱ्यावर येतील. न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाबरोबर पाच सामन्यांची टी-२० मालिका आणि बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.
"या दौऱ्यांचे आयोजन करणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे न्यूझीलंड क्रिकेटला अर्थसहाय्य मिळते. या कठीण काळात खेळ आणि त्याच्या चाहत्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे. तिकिटांच्या किंमती आपल्याला निम्म्याने कमी कराव्या लागतील. अतिरिक्त खर्च आणि खेळाच्या खर्चामुळे तिकिटांची किंमत कमी करणे योग्य नाही. पण आता तो योग्य आहे'', असे न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी म्हटले आहे.