नवी दिल्ली - बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड झाली आहे. गांगुली सध्या अध्यक्षपदाच्या रुपाने दुसरी इंनिग सुरू करत आहे. या निवडीनंतर गांगुलीवर शुभेच्छाचा वर्षाव सुरू आहे. थेट पाकिस्तानमधून माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही गांगुलीला 'बधाई हो' म्हटले आहे. तसेच त्याने गांगुलीचे निवड योग्य असल्याचे सांगितले.
शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात तो गांगुलीला शुभेच्छा देताना दिसत आहे. आयपीएलमध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात शोएबने कोलकाता नाइट रायडर्ससाठी सामने खेळली आहेत.
गांगुली विषयी बोलताना शोएब म्हणाला की, 'खेळाडूंच्या कठिण प्रसंगात गांगुली त्या खेळाडूंची मानसिकता चांगल्या पध्दतीने बदलवतो. तसेच त्याला क्रिकेट विषयी चांगला ज्ञान आहे. यामुळे त्याची अध्यक्षपदी निवड योग्य आहे.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात सौरव गांगुलीची भूमिका मोलाची आहे. १९९७-९८ काळात कधीही भारतीय संघ पाकिस्तानला पराभूत करु शकेल असे वाटले नव्हते. पण गांगुलीने साकारात्मक दृष्टीकोनातून खेळाडूंना तयार केले असल्याचे, शोएबने सांगितले.
दरम्यान, सौरव गांगुली एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी अध्यक्ष राहणार आहे. कारण तो मागील ५ वर्षांपासून बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार कोणताही अधिकारी सहा वर्ष कोणत्याही पदावर राहू शकतो.
हेही वाचा - दरवर्षी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा..आयसीसीची योजना, बीसीसीआयचा नकार
हेही वाचा - VIDEO : क्रिकेटमध्ये कधी असा 'पासिंग' कॅच पहिलात का?