नवी दिल्ली - माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शूजची समस्या कशी होती हे सांगितले आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रासोबत झालेल्या चर्चेत नेहराने या शूजसंबंधी एक किस्सा सांगितला.
रणजी करंडक सामन्यासाठी आणि कसोटी पदार्पणाच्या सामन्यासाठी एकच शूजची जोडी असल्याचे नेहराने म्हटले आहे. नेहराने 1999 साली कोलंबोमध्ये श्रीलंकेविरूद्ध पदार्पण केले होते. नेहरा म्हणाला, "माझ्याकडे रणजी ट्रॉफीत वापरलेले शूज होते. हे शूज मी 1999च्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी प्रत्येक डावानंतर मी हे शूज शिवायचो.''
नेहराने भारताकडून 17 कसोटी, 120 एकदिवसीय आणि 27 टी-20 सामने खेळले आहेत.