ETV Bharat / sports

कोरोनाकाळात राहुल द्रविडवर सोपवली जाणार मोठी जबाबदारी? - rahul dravid and task force news

एसओपीनुसार खेळाडूंनी आपापल्या केंद्रांवर प्रशिक्षण घेण्यापूर्वी संमती फॉर्मवर सही केली पाहिजे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा आरोग्याच्या समस्या अनुभवणार्‍या व्यक्तीला येथे बंदी आहे. बंगळुरूस्थित एनसीए येथे पुन्हा प्रशिक्षण सुरू करण्यासाठी असलेल्या या कोरोना टास्क फोर्समध्ये द्रविड, एक वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता अधिकारी तसेच बीसीसीआय एजीएम, क्रिकेट ऑपरेशनचा समावेश असेल.

nca chief rahul dravid may become chief of covid-19 task force
कोरोनाकाळात राहुल द्रविडवर सोपवली जाणार मोठी जबाबदारी?
author img

By

Published : Aug 4, 2020, 2:39 PM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कोरोना टास्क फोर्सचे गठन करणार असून या फोर्सची जबाबदारी राहुल द्रविडकडे सोपवली जाऊ शकते. द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख आहे. बीसीसीआयने राज्यांना पाठवलेल्या प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) मधील राज्य संघटनांना याची माहिती दिली. एनसीए प्रमुख असल्याने द्रविड या टास्क फोर्सचा अध्यक्षही होऊ शकतो.

एसओपीनुसार खेळाडूंनी आपापल्या केंद्रांवर प्रशिक्षण घेण्यापूर्वी संमती फॉर्मवर सही केली पाहिजे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा आरोग्याच्या समस्या अनुभवणार्‍या व्यक्तीला येथे बंदी आहे. बंगळुरूस्थित एनसीए येथे पुन्हा प्रशिक्षण सुरू करण्यासाठी असलेल्या या कोरोना टास्क फोर्समध्ये द्रविड, एक वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता अधिकारी तसेच बीसीसीआय एजीएम, क्रिकेट ऑपरेशनचा समावेश असेल.

त्यांच्या जबाबदार्‍यांमध्ये 'खेळाडूंशी स्पष्ट व नियमितपणे संवाद साधणे, जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा उल्लेख करणे, तसेच कोरोनामधील प्रकरणांविषयी माहिती देणे' या गोष्टींचा समावेश आहे. खेळाडू आणि राज्यांच्या केंद्रांप्रमाणेच एनसीएमधील क्रिकेटपटूंनाही प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी सामंजस्य करार करावा लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.