ETV Bharat / sports

'थाला' धोनीबद्दल चेन्नईचे मालक श्रीनिवासन यांनी केली महत्वाची घोषणा, म्हणाले... - आयपीएल २०२० न्यूज

आयपीएलचा तेरावा हंगाम चेन्नईसाठी फारसा चांगला ठरला नाही. यात धोनीला देखील नावानुरूप कामगिरी करता आलेली नाही. मला वाटते की हे एक वाईट वर्ष होते. धोनी संघाचा कर्णधार होता आणि तो यापुढेही संघाचे नेतृत्व करत राहील, असे चेन्नईचे मालक एन. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.

N Srinivasan Confirms MS Dhoni’s Future, Says Wicketkeeper Will Continue To Lead CSK
'थाला' धोनीबद्दल चेन्नईचे मालक श्रीनिवासन यांनी केली महत्त्वाची घोषणा, म्हणाले...
author img

By

Published : Nov 5, 2020, 5:12 PM IST

मुंबई - आयपीएलचा तेरावा हंगाम चेन्नईसाठी अत्यंत निराशाजनक ठरला. १४ सामन्यांमध्ये केवळ ६ विजय मिळवत त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महत्वाची बाब, म्हणजे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईच्या संघाला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. यानंतर धोनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच धोनी आयीएलमधून देखील निवृत्त होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. याविषयावरुन चेन्नईचे मालक एन. श्रीनिवासन यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे.

श्रीनिवासन याविषयी म्हणाले की, आयपीएलचा तेरावा हंगाम चेन्नईसाठी फारसा चांगला ठरला नाही. यात धोनीला देखील नावानुरूप कामगिरी करता आलेली नाही. मला वाटते की हे एक वाईट वर्ष होते. धोनी संघाचा कर्णधार होता आणि तो यापुढेही संघाचे नेतृत्व करत राहील.

पुढच्या वर्षी आम्ही दमदार पुनरागमन करू...

सामना संपल्यानंतर धोनीने संघातील बदलाविषयी काही गोष्टी सांगितल्या. त्या बोलण्यामागे त्याचा नक्की काय हेतू होता हे मला चांगले माहिती आहे. त्याने याबाबत माझ्याशी चर्चा केलेली आहे. दहा यशस्वी वर्षांनंतर एखादे वाईट वर्ष आले तर त्यात खचून जायचे नसते. पुढल्यावर्षी आम्ही दमदार पुनरागमन करू याची मला खात्री आहे, असेही श्रीनिवासन यांनी सांगितले.

ऋतुराज विषयी काय म्हणाले श्रीनिवासन -

ऋतुराजने अखेरच्या तीन सामन्यात सलग तीन अर्धशतक झळकावत, आपली छाप सोडली. यावर श्रीनिवासन म्हणाले, कोरोनाच्या आजारातून ऋतुराज थोडासा उशिरा सावरला. फाफ डु प्लेसिसने म्हटल्याप्रमाणे त्याच्यात तरूणपणी खेळणाऱ्या कोहलीची झलक दिसते. महत्त्वाची बाब म्हणजे भारताला बऱ्याच दिवसांनी इतका चांगला आणि गुणवान खेळाडू मिळाला. नक्कीच तो विराटसारखा यशस्वी होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.