नवी दिल्ली - सलामीवीर पृथ्वी शॉ (नाबाद १८५) आणि यशस्वी जयस्वाल (७५) यांच्या शानदार खेळीमुळे मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी सौराष्ट्रला ९ गडी राखून पराभूत केले.
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात २८४ धावा उभारल्या. सौराष्ट्रकडून समर्थ व्यासने ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ९० तर, विश्वराज जडेजाने ४ चौकार आणि एका षटकारासह ५३ धावा केल्या.
-
Mumbai Won by 9 Wicket(s) (Qualified) #MUMvSAU @paytm #VijayHazareTrophy #QF4 Scorecard:https://t.co/sx67D7bsmm
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai Won by 9 Wicket(s) (Qualified) #MUMvSAU @paytm #VijayHazareTrophy #QF4 Scorecard:https://t.co/sx67D7bsmm
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 9, 2021Mumbai Won by 9 Wicket(s) (Qualified) #MUMvSAU @paytm #VijayHazareTrophy #QF4 Scorecard:https://t.co/sx67D7bsmm
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 9, 2021
प्रत्युत्तरात मुंबईने ४१.५ षटकातच हा सामना खिशात घातला. पृथ्वी आणि यशस्वी यांनी पहिल्या गड्यासाठी २३८ धावांची भागीदारी रचली. पृथ्वीने आपल्या खेळीत २१ चौकार आणि ७ षटकारांची लयलूट केली. तर, यशस्वीने १० चौकार आणि एका षटकार ठोकला. मुंबईकडून शम्स मुलानीने दोन, शिवम दुबे, तनुष कोटियान आणि प्रशांत सोलंकीने प्रत्येकी एक गडी बाद केला.
तर, सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने मुंबईचा एकमेव गडी बाद केला.
हेही वाचा - झहीर-सागरिकाची माँ छिन्नमस्तिका मंदिराला भेट...पाहा फोटो