ETV Bharat / sports

IPL २०२१: रोहित ब्रिगेड दिसणार नव्या रुपात, मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च - आयपीएल २०२१ न्यूज

दिल्ली आणि चेन्नई संघापाठोपाठ मुंबई इंडियन्सने देखील नवी जर्सी लॉन्च केली आहे. सोशल मीडियावर मुंबईने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

mumbai indians launch new jersey for ipl 2021
IPL २०२१: रोहित ब्रिगेड दिसणार नव्या रुपात, मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च
author img

By

Published : Mar 28, 2021, 3:35 PM IST

मुंबई - दिल्ली आणि चेन्नई संघापाठोपाठ मुंबई इंडियन्सने देखील नवी जर्सी लॉन्च केली आहे. सोशल मीडियावर मुंबईने याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. नव्या जर्सीच्या बॉर्डर आणि कॉलरवर नारंगी रंग वापरला आहे. ही नवी जर्सी चाहत्यांच्या पसंतीला उतरली असून त्यावर चाहते भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.

आयपीएलचा चौदाव्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी काही दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिला आहे. सर्व संघ या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करत आहेत. या हंगामासाठी दिल्ली आणि चेन्नई संघाने नवी जर्सी लॉन्च केली. यानंतर आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ अशी ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सने देखील आपली नवी जर्सी लॉन्च केली आहे.

मुंबईच्या नव्या जर्सीत बॉर्डर आणि कॉलरवर नारंगी रंग वापरला आहे. यामुळे जर्सी उठून दिसत आहे. मुंबईची नवी जर्सी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. अनेक चाहत्यांनी नव्या जर्सीविषयी आपले मत मांडले आहेत.

दरम्यान, मागील वर्षी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले होते. या वर्षी देखील मुंबईचा संघा विजेतेपदाचा मुख्य दावेदार आहे. यावेळी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना ९ एप्रिलला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आहे.

हेही वाचा - सचिन तेंडूलकर पाठोपाठ युसूफ पठाणलाही कोरोनाची लागण

हेही वाचा - Ind vs Eng ३rd ODI : इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताची दमदार सुरूवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.