ETV Bharat / sports

एमएसके प्रसाद बॉल टेम्परिंगच्या विरोधात

क्रिकेट कनेक्टिव्ह इव्हेंटमध्ये प्रसाद म्हणाले, "नियम सांगतात की आपण चेंडूला चमकवण्यासाठी अतिरिक्त गोष्टी वापरु शकत नाही. जर तसे केले तर बाटलीच्या झाकणाचा किंवा इतर कोणत्याही प्रतिबंधित वस्तूंचा वापर करण्यासारखीच ही गोष्ट आहे. यामुळे चेंडूत फेरफार होऊ शकतो."

mk prasad reaction on using external objects to shine the ball
एमएसके प्रसाद बॉल टेम्परिंगच्या विरोधात
author img

By

Published : May 18, 2020, 12:57 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी बॉल टेम्परिंगबाबत स्पष्टीकरण दिले आहे. चेंडू चमकवण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टी वापरण्याच्या विरोधात असल्याचे प्रसाद यांचे म्हणणे आहे. कोरोना व्हायरसमुळे येत्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये बरेच बदल दिसू शकतात. संक्रमणाची शक्यता लक्षात घेता, कसोटी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूला चमक देण्यासाठी लाळेच्या जागी कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यास मान्यता मिळू शकते.

क्रिकेट कनेक्टिव्ह इव्हेंटमध्ये प्रसाद म्हणाले, "नियम सांगतात की आपण चेंडूला चमकवण्यासाठी अतिरिक्त गोष्टी वापरु शकत नाही. जर तसे केले तर बाटलीच्या झाकणाचा किंवा इतर कोणत्याही प्रतिबंधित वस्तूंचा वापर करण्यासारखीच ही गोष्ट आहे. यामुळे चेंडूत फेरफार होऊ शकतो."

ते पुढे म्हणाले, "म्हणूनच या प्रस्तावाला मी पूर्णपणे विरोध केला आहे. आपण फक्त घाम आणि लाळेचाच वापर करू शकतो, असे कायद्यात म्हटले गेले आहे. खेळाडू अजूनही चेंडू चमकवण्यासाठी घामाचा आणि थुंकीचा वापर करतात. परंतु सद्य परिस्थिती लक्षात घेता ही पद्धत रोखली पाहिजे. पॅट कमिन्सने या प्रस्तावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कमिन्सच्या चिंतेचे मी पुर्ण समर्थन करतो."

आयसीसीच्या सध्याच्या नियमांनुसार, कृत्रिम वस्तूंमुळे चेंडूला लकाकी दिली की त्याला टेम्परिंग मानले जाते. याचा अर्थ असा, की आता आगामी काळात बॉल टेम्परिंग कायदेशीर केले जाऊ शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.