चेन्नई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. यंदाच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत तो खेळणार की नाही हे अजून उघड झालेले नाही. मात्र, २०२१ मधील आयपीएल स्पर्धेतबाबत धोनीचे भविष्य काय? याचा खुलासा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी केला आहे.
हेही वाचा - IND vs AUS : टीम इंडिया काळी पट्टी बांधून मैदानात, जाणून घ्या कारण...
धोनी पुन्हा भारतीय संघाकडून खेळेल की नाही हे स्पष्ट नाही. मात्र, २०२१ मध्ये आयपीएलच्या लिलाव दरम्यान त्याला चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघात तो असणार असल्याचे मत श्रीनिवासन यांनी मांडले आहे. एका कार्यक्रमात त्यांनी हा खुलासा केला. 'तो कधीपर्यंत खेळत राहील अथवा कधी निवृत्ती घेईल याची लोकं चर्चा करतात. मात्र, मी हमी देतो की तो यावर्षी खेळेल. पुढच्या वर्षी तो लिलावात असेल आणि त्याला कायम राखले जाईल', असे श्रीनिवासन म्हणाले आहेत.
ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंशी करार केला. यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला कोठेही स्थान देण्यात आलेले नाही. धोनीला मागील वर्षी केलेल्या करारातून मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, बीसीसीआयने धोनीला करारमुक्त करुन धोनीने निवृत्ती घ्यावी, असा अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे.