जम्मू-काश्मीर - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने, वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. धोनी सद्या काश्मीरच्या घाटीत भारतीय लष्कारासोबत ड्यूटीवर आहे. त्याचा काही दिवसांपूर्वी जवानांसोबत व्हॉलीबॉल खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता धोनीचा एक हटके फोटो तुफान व्हायरल होत आहे.
-
This Man ❤️❤️❤️
— रोहित WAR (@WAR_TheYudhh) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
True Idol 🙏🙏#MSDhoni pic.twitter.com/9uHLoG72nZ
">This Man ❤️❤️❤️
— रोहित WAR (@WAR_TheYudhh) August 5, 2019
True Idol 🙏🙏#MSDhoni pic.twitter.com/9uHLoG72nZThis Man ❤️❤️❤️
— रोहित WAR (@WAR_TheYudhh) August 5, 2019
True Idol 🙏🙏#MSDhoni pic.twitter.com/9uHLoG72nZ
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये धोनी सैनिकी वेशात असून तो ट्रेनिंगआधी आपले बूट पॉलिश करताना दिसत आहे. धोनीच्या चाहत्याने आपल्या ट्विटर अकांउट वरुन हा फोटो शेअर केला आहे.
भारतीय लष्कराकडून महेंद्रसिंह धोनीला लेफ्टनंट कर्नल हे मानाचे पद बहाल करण्यात आले आहे. यापूर्वी धोनीने भारतीय लष्करासोबत काम करण्याचे, अनेक वेळा बोलून दाखवले होते. त्यामुळे त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत जवानांसोबत आपला वेळ घालवत आहे.