लंडन - विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. यानंतर भारताचा माजी कर्णधार तथा अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेईल, असे बोलेले जात होते. मात्र, धोनीने निवृत्तीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. एका संकेतस्थळाने धोनी आगामी विश्वकरंडकापर्यंत खेळत राहणार असल्याचे वृत्त दिले आहे.
महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय विश्वकरंडक तसेच टी २० विश्वकरंडक आणि चॅम्पियन स्पर्धा जिंकली आहे. धोनी हा संघातील महत्त्वाचा अनुभवी खेळाडू मानला जातो. मात्र, त्याला मागील काही सामन्यात धावा जमवता आल्या नाहीत. त्यामुळे धोनीने निवृत्ती घ्यावी अशी चर्चा रंगली आहे. तसेच धोनी विश्वकरंडकानंतर निवृत्त होणार असल्याचे बोलले जात होते.
उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले. त्यानंतर धोनी निवृत्ती जाहीर करेल असे वाटत होते. मात्र धोनीने अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही. दरम्यान याविषयी एका संकेतस्थळाने धोनी पुढील विश्वकरंडक खेळून निवृत्त होणार असल्याचे वृत्त दिले आहे. पुढील टी२० विश्वकरंडक ऑस्ट्रेलियामध्ये होणार असून धोनी हा विश्वकरंडक खेळणार असल्याचे त्या वेबसाईटचे म्हणणे आहे.