ETV Bharat / sports

'२०१९ विश्वकरंडकात धोनी कर्णधार असता, तर आपण विश्वविजेते असतो' - महेंद्रसिंह धोनी

आयसीसीने तुमचा दशकातील आवडता कर्णधारा याविषयी विचारल्यानंतर बहुतांश क्रिकेट चाहत्यांनी धोनीला पसंती दर्शवली. अनेकांनी तर धोनीने विश्वकरंडक घेतलेला फोटो शेअर केला आहे.

MS Dhoni all the way: ICC asks for favourite captain of decade, fans respond
'विश्वकरंडकात धोनी कर्णधार असता, तर आपण विश्वविजेते असतो'
author img

By

Published : Dec 26, 2019, 1:03 PM IST

हैदराबाद - इंग्लंड विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व जर महेंद्रसिंह धोनीकडे दिले असते, तर भारतीय संघ विश्वविजेता ठरला असता, असे मत एका क्रिकेट चाहत्याने व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेट चाहत्यांना, तुमचा या दशकातील आवडता कर्णधार कोण ? असा प्रश्न विचारला. तेव्हा एकाने आयसीसीच्या त्या ट्विटला रिट्विट करत आपलं मत व्यक्त केलं. महत्वाची बाब म्हणजे, बहुतांश क्रिकेट चाहत्यांनी धोनीला आवडता कर्णधार म्हणून निवडले.

  • Tell us who your favourite captain of the decade is.

    Go 👇

    — ICC (@ICC) December 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आयसीसीने तुमचा दशकातील आवडता कर्णधार याविषयी विचारल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी धोनीला पसंती दर्शवली. अनेकांनी तर धोनीने विश्वकरंडक घेतलेला फोटो शेअर केला आहे. महत्वाची बाब म्हणजे, पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांनीही धोनी आपला आवडता कर्णधार असल्याचे सांगितलं.

धोनीने २०१४ मध्ये कसोटी आणि २०१७ मध्ये मर्यादीत षटकांमध्ये संघाचे कर्णधारपद सोडले होते. पण, तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करत आहे.

दरम्यान, धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ मधील टी-२० विश्वकरंडक, २०११ मधील विश्वकरंडक आणि २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. सध्या महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपासून लांब आहे. त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.

आयसीसीच्या प्रश्नावर क्रिकेट चाहत्यांनी केलेले ट्विट पाहा...

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.