कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि तिची पत्नी हसीन जहाँ यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरु आहे. हसीन जहाँ अनेकवेळा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ आणि फोटो शेअर करत शमीवर निशाना साधत असते. यावेळी हसीनने अतिशय टोकाचे पाऊल उचलत, तिच्या मुलीचे आडनाव बदलले आहे.
शमी आणि हसीन जहाँ यांच्या वादानंतर त्यांची मुलगी ही आईकडेच म्हणजे हसीन सोबत राहते. नुकतीच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आपल्या मुलीचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘आराह जहाँ’ असे लिहिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, आराह हे शमीच्या मुलीचे नाव आहे. परंतु हसीन जहाँने आपल्या मुलीच्या नावापुढे शमीचे आडनाव न लावता स्वत:चे आडनाव लावले आहे. अर्थात तिच्या आणि तिच्या मुलीच्या जीवनात शमीला कोणतेही स्थान नाही, असे तिला अप्रत्यक्षपणे सांगायचे आहे.
शमी आणि हसीन जहाँ या दोघांनी २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांच्यात २०१८ मध्ये वाद झाले. यानंतर दोघे वेगळे राहत आहेत. हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी यांचा वाद कोर्टात सुरु असून अद्याप दोघांना घटस्फोट मिळालेला नाही. हसीन जहाँने, शमीचे अनेक मुलीसोबत अफेयर होते. तो मला मारहाण करायचा. तसेच मॅच फिक्सिंगमध्ये देखील शमीचा सहभाग आहे, असे अनेक गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा - ICC World Test Championship: सोप्या शब्दात जाणून घ्या, कोणता संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार अंतिम सामना
हेही वाचा - बिग बॅश लीग २०२१ : अंतिम सामन्यासाठी प्रेक्षक क्षमता वाढवली