मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी पंजाब किंग्ज संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाबचा गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला असून तो आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना दुखापत झाली होती. पॅट कमिन्सचा उसळता चेंडू शमीच्या हातावर आदळला होता. यात शमीला दुखापत झाली आणि त्याने उर्वरित मालिकेतून माघार घेत उपचासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमी गाठली होती.
उपचाराअंती शमी तंदुरूस्त झाला असून तो पुनरागमनासाठी सज्ज आहे. शमी म्हणाला, 'मी पूर्णपणे फिट असून खेळण्यासाठी तयार आहे. फलंदाजीदरम्यान, दुखापत होणे दुर्दैवी होते. कारण माझ्या फिटनेस संदर्भात कोणतीही अडचण नव्हती. परंतु मी यात काही करू शकत नाही. हा खेळाचा भाग आहे.'
मी नेहमी साकारात्मक बाबीचा विचार करतो. माझ्यासाठी आयपीएलचा मागील हंगाम चांगला ठरला. मला आशा आहे की, या हंगामात देखील ती लय कायम राखेन. दुखापतीमुळे मला आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळाला, असे देखील शमीने सांगितलं.
दरम्यान, शमीने मागील हंगामान २० गडी बाद केले होते. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ लाभली नव्हती. यामुळे पंजाबने झाय रिचर्डसन, रीले मेरेडिथ आणि मोयजेएस हेनरिक्स यांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
हेही वाचा - NZ vs Ban, १st T२० : न्यूझीलंडचा बांगलादेशवर ६६ धावांनी विजय
हेही वाचा - IND VS ENG : मैदानावर पाय ठेवताच विराटने केला 'हा' विक्रम