ETV Bharat / sports

IND vs WI : मोहम्मद शमी जगभरातील गोलंदाजांवर ठरला भारी - Mohammed Shami

शमीने २०१९ वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमीने आपलं पहिलं स्थान कायम राखले आहे. वर्षाच्या अखेरी शमीच्या खात्यात ४२ बळी जमा आहेत.

Mohammed Shami ends up as highest ODI wicket taker in a calendar year for 2nd time in his career
IND vs WI : मोहम्मद शमी जगभरातील गोलंदाजांवर ठरला भारी
author img

By

Published : Dec 22, 2019, 7:58 PM IST

कटक - भारत आणि वेस्ट इंडीज संघात तिसरा आणि अखेरचा निर्णायक सामना कटकच्या मैदानात रंगला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा विंडीजने पूरन आणि पोलार्डच्या अर्धशतकांच्या जोरावर ३१५ धावा केल्या. दरम्यान, या सामन्यात मोहम्मद शमीने १ गडी बाद केले. पण, तो २०१९ या वर्षात सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.

शमीने २०१९ वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमीने आपलं पहिलं स्थान कायम राखले आहे. वर्षाच्या अखेरीच्या शमीच्या खात्यात ४२ बळी जमा आहेत. तर या यादीत दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आहे. त्याने ३८ बळी घेतले आहेत. एका वर्षात सर्वाधिक बळी घेण्याची शमीची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही शमीने हा विक्रम केला आहे. महत्वाची बाब म्हणजे या यादीत भारताच्या भुवनेश्वर कुमारचाही समावेश आहे. भुवी ३३ बळीसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे.

Mohammed Shami ends up as highest ODI wicket taker in a calendar year for 2nd time in his career
मोहम्मद शमी

२०१९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे सर्वोत्तम ५ गोलंदाज –

  • मोहम्मद शमी – भारत – ४२ बळी
  • ट्रेंट बोल्ट – न्यूझीलंड – ३८ बळी
  • लॉकी फर्ग्यसुन – न्यूझीलंड – ३५ बळी
  • मुस्तफिजूर रेहमान – बांगलादेश – ३४ बळी
  • भुवनेश्वर कुमार – भारत – ३३ बळी

हेही वाचा - 'माझं बलस्थान आणि गेम चेंजर...', हिटमॅन रोहितने पत्नी रितिकाला केलं बर्थ-डे विश

हेही वाचा - ९४ हजार कोटी रुपयांचा 'वारसदार' असलेल्या आर्यमाननं क्रिकेटमधून घेतला ब्रेक!

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.